शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विरोधीपक्ष नेतेपदासाठी १८ नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 23:20 IST

वाद गेला विकोपाला; नगरसेविकेचा शहर अध्यक्षांकडे राजीनामा

ठाणे : विरोधी पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ठाणे विरुद्ध कळवा, मुंब्रा असा वाद रंगला असतानाच आता मुंब्य्रातील १८ नगरसेवक यासाठी एकवटले असून ते बंडाच्या पवित्र्यात आहेत. महापालिकेत जास्तीचे नगरसेवक नेहमीच मुंब्य्राने दिले आहेत. मात्र, असे असतानाही येथील नगरसेवकांना पालिकेत आजही स्थान नाही, असा सवाल करून मुंब्य्रातील नगरसेविका फरहाना शाकीर शेख यांनी शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनात सोमवारी राष्टÑवादीच्या नगरसेवकांमध्ये बैठक झाली होती. तीत भावी विरोधी पक्षनेता कोण यावरून वाद निर्माण झाला होता. यापूर्वी अडीच वर्षे कळव्याला विरोधी पक्षनेतेपद दिले असल्याने आता ते ठाण्याला मिळावे, अशी मागणी ठाण्यातील नगरसेवकांनी लावून धरली होती. मात्र, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा आणि मुंब्य्राला विधानसभा निवडणुकीआधी शब्द दिला असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे कळवा किंवा मुंब्य्रालाच मिळावे, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली होती.दरम्यान, नेहमीच महापालिकेतील महत्त्वाची पदे ही कळवा किंवा ठाण्याच्या वाटेला गेलेली आहेत. मुंब्य्रावर नेहमीच अन्याय झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या खेपेला विरोधी पक्षनेतेपद हे मुंब्य्राला मिळावे यासाठी येथील १८ नगरसेवक एकवटले आहेत. त्यानुसार येथील नगरसेविका फरझाना शाकीर शेख यांनी याच मागणीसाठी सोमवारी उशिरा शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुंब्य्राला पालिकेत स्थान मिळावे यासाठी त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.यासंदर्भात शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. मात्र, राजीनामा स्वीकारला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षनेतेपदाचा मान कोणाला मिळणार; ठाणे, कळवा की मुंब्रा हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.बैठकीमधून नाराजांचा काढता पायविरोधी पक्षनेतेपद हे कळवा किंवा मुंब्य्राला मिळावे अशी आग्रही भूमिका घेताच आम्ही वरिष्ठांकडून कमिटमेंट घेतली असल्याने ठाण्याकडेच हे पद राहणार असल्याचा दावा राष्टÑवादीच्या ठाण्यातील नगरसेवकांनी केला होता. त्यामुळे नाराज झालेल्या काही नगरसेवकांनी या बैठकीतून काढता पाय घेतला होता.

टॅग्स :tmcठाणे महापालिका