शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नववी नापासांसाठी १७ नंबरचा पर्याय!

By admin | Updated: July 16, 2015 23:31 IST

एन. के. जरग : वर्ष वाचवून दहावी परीक्षेला बसण्याचा सोपा पर्याय

बिर्लागेट : संपूर्ण देशात डिजिटल इंडियाचा गाजावाजा होत असताना ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील २० ते ३० गावांना अद्याप दळणवळणाच्या सोयीसुविधा नसल्याने गावांतील मुलामुलींना इयत्ता सातवीनंतरचे पुढील शिक्षण घेता येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया करण्याची घोषणा केली. यानंतर, राज्यातील शिक्षण विभागाने शाळाबाह्यमुलांचे सर्वेक्षण केले. याशिवाय, ‘सब बढे, सब पढे’ म्हणत सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शिक्षणावर लाखोंचा खर्च करीत आहे. मात्र, तरीही हजारो मुले आजही शिक्षणापासून वंचित आहेत.कल्याण तालुक्यात १२५ जिल्हा परिषदेच्या शाळा असून ४७८ शिक्षक साडेबारा ते तेरा हजार विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम करतात. १०१ गावे आणि १९ पाड्यांत जिल्हा परिषदेचे पहिली ते चौथी अथवा सातवीपर्यंत वर्ग आहेत. पुढील शिक्षणासाठी त्यांना कल्याण, रायते, गोवेली, टिटवाळा, म्हारळ, वरप, मोहने, मांडा अथवा अंबरनाथ, मुरबाड येथे जावे लागते. परंतु, येथे जाण्यासाठी त्यांना बस मिळत नाही. कारण, या गावांमध्ये बसच येत नाही. रस्ते आहेत, जागा आहे, परंतु बस नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.म्हसरोंडी, भोंगळपाडा, आडिवली, वाघेरापाडा, पठारपाडा, नालेपाडा, झापणी, ठाकूरवाडी, अनखर, बेलपाडा, हल, वैतागवाडी, खोडाखडक, बांगरवाडी, काकडपाडा, पळसोली, वेहळे, गणेशवाडी, संतेचापाडा, नांदप, पिंपळोली, वाहोळीपाडा, बांधण्याचापाडा, राया, ओसर्ली, गेरसे, निंबवली, मोस, सांगोडा, कोठेरी, वासुंद्री आदी २० ते ३० गावपाड्यांत बसची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत.म्हसरोंडी गावातील ग्रामस्थांनी बस सुरू करावी म्हणून कल्याण एसटी आगार व्यवस्थापकाकडे अर्ज करूनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. कल्याण आगारात एकूण ७४ बस, ४ मिनीबस आणि ४७८ कर्मचारी आहेत. मात्र, या गावांना बस मिळत नाही. यामुळे ३ ते ४ किमी अंतर तुडवत मुख्य ठिकाणी यावे लागते, अशी व्यथा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. यावर लवकरच तोडगा निघण्याची अशा आहे. (वार्ताहर)आमच्या गावात ५९ घरे आणि २८२ कुटुंबे आहेत. गावात रस्ते, लाइट, पाणी, शाळा आहे, मात्र बस नाही. यामुळे १५ ते २० मुलेमुली पुढील शिक्षणापासून वंचित राहिली आहेत.- गणपत आगिवले, ग्रामस्थ, म्हसरोंडीबस सुविधेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यास मी स्वत: याचा पाठपुरावा करतो व बस कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करतो.- डॉ. प्रदीप पवार, अति. गटशिक्षणाधिकारी, कल्याणआमच्याकडे गावात बस सुरू करण्याबाबत कोणीही अर्ज केले नाहीत. - एस.एन. रूपवते, कल्याण आगारप्रमुख गावातील ठरावीक मुलेच पुढील शिक्षणासाठी पायी ३ ते ४ किमी अंतर चालत जातात.- विशाल आरेकर, शिक्षक, जि.प. शाळा म्हसरोंडी, कल्याण