ठाणे : कासारवडवली भागातील ‘सी हॉक’ या बारवर स्थानिक पोलिसांनी टाकलेल्या धाडीत १६ बारबालांसह १७ जणांना अटक करण्यात आली. नंतर, या सर्वांची जामिनावर सुटका झाली आहे.गिऱ्हाइकांना आकृष्ट करण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून बारमधील तरुणी अश्लील हावभाव करीत असल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.डी. टेळे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ४ जुलै रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास कासारवडवली पोलिसांनी या बारवर धाड टाकली. त्या वेळी १६ बारबालांसह धर्मेंद्रकुमार नकुल साव (१९) या वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर विविध कलमांखाली कारवाई केली. पोलीस निरीक्षक टेळे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
बारवरील धाडीत १६ बारबालांसह १७ जणांना अटक
By admin | Updated: July 6, 2015 03:02 IST