शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वला गॅस योजनेपासून 16 हजार महिला वंचित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:09 IST

सरकारविरोधात संताप : लक्ष्यांंकयादीची प्रतीक्षा करण्याचा सल्ला

 लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : केंद्र शासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेद्वारे जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना एलपीजी गॅसची जोडणी (कनेक्शन) मोफत दिले जात आहे. याशिवाय, स्वयंपाकासाठी शेगडीही दिली जात आहे. मात्र, या ६० हजार २८३ लाभार्थी महिलांपैकी ४४ हजार १५२ लाभार्थ्यांचा जिल्ह्यातील लक्ष्यांंक गेल्या वर्षीच पूर्ण झाला आहे. आता जिल्ह्यात ही योजना तात्पुरती थांबवली आहे. त्यामुळे या लाभापासून वंचित असलेल्या १६ हजारांंवर महिलावर्गात राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे.

केंद्राने जाहीर केलेल्या या उज्ज्वला गॅस योजनेचा जिल्ह्यात ६० हजार २८३ महिला लाभार्थ्यांचा लक्ष्यांंक दिला होता. त्यापैकी तब्बल ४४ हजार १५२ महिलांना या गॅस कनेक्शनसह त्याच्याशी संबंधित साहित्याचा लाभ मोफत देण्यात आला आहे. मात्र, हा लक्ष्यांंक गेल्याच वर्षी पूर्ण झाल्यामुळे या लाभाची अपेक्षा असलेल्या आदिवासी व मागासवर्गीय महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. एवढेच नव्हे तर रेशनिंग दुकानदार व महिलांमध्ये शाब्दिक चकमकीही ऐकायला मिळत आहेत. त्यांची ही नाराजी काही अंशी दूर करण्यासाठी पुढील लाभार्थी लक्ष्यांंकाची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जात आहे.जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून थांबवण्यात आले आहे. जिल्ह्यातील लाभार्थीसंख्येचा लक्ष्यांंक केंद्र शासनाकडून निश्चित झाल्यानंतर आणि राज्य शासनाने त्यास सहमती दिल्यावर लवकरच या मोफत गॅस कनेक्शन व साहित्याचा लाभ दिला जाणार आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यापासून या योजनेकडे तसे फारसे लक्ष दिले नाही. तरीपण, आता राॅकेल वापरणे बंद करण्यात येणार असल्यामुळे या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेला महत्त्व येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.

मोफत लाभ दिला६० हजार २८३ महिला लाभार्थ्यांचा लक्ष्यांंक दिला होता. त्यापैकी तब्बल ४४ हजार १५२ महिलांना या गॅस कनेक्शनसह त्याच्याशी संबंधित साहित्याचा लाभ मोफत देण्यात आला आहे. ६० हजार २८३ महिला लाभार्थ्यांचा लक्ष्यांंक दिला होता.