शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मॅट्रीमाेनीयल साइटवरून तरुणीला १६ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 02:11 IST

यूकेमध्ये डाॅक्टर असल्याच्या भूलथापा

कल्याण : यूकेमध्ये एमडी डॉक्टर असल्याचे सांगून कल्याणमधील एका ३३ वर्षीय तरुणीला १६ लाख ४५ हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात प्रकाश शर्मा नामक व्यक्तीविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणात फसवणूक झालेली तरुणी खडकपाडा परिसरात राहणारी असून, नवी मुंबई येथील एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. या तरुणीने ‘जीवनसाथी डॉट कॉम’वर लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले होते. यूकेमध्ये राहणाऱ्या प्रकाश शर्माने तिच्याशी संपर्क साधला आणि लग्नासाठी तयार असल्याचे तिला सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये ऑनलाइन चॅटिंग सुरू होती. जानेवारीत भारतात येणार असल्याचे प्रकाश याने तिला सांगितले. २३ जानेवारीला शर्मा याने फोन करून सांगितले की, तो दिल्ली एअरपोर्टला आला आहे. मात्र, त्याच्याजवळ सोने असल्याने त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे. यातून सुटण्यासाठी पैसे भरावे लागतील. असे सांगत त्याने तिच्याकडे प्रारंभी ६५ हजार रुपयांची मागणी केली. संबंधित तरुणीने नेटबॅकिंगद्वारे प्रकाशला ते दिले. त्यानंतरही २४, २५ आणि २६ जानेवारीला काही ना काही बतावणी करून शर्माने तिच्याकडून तब्बल १६ लाख ४५ हजार रुपये घेतले आणि तो अचानक गायब झाला. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे समजताच तरुणीने कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाणे गाठत आरोपी शर्मा याच्याविरोधात तक्रार दाखल केली.