शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील १६ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 02:58 IST

आयुक्तांकडून चौकशी : कमी वसुली भोवली

उल्हासनगर : एलबीटीची कमी वसुली झाल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी १६ निलंबित कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यात ते दोषी सापडल्याने आयुक्तांनी त्यांचे निलंबन कायम ठेवले. तसेच दोन वर्षांची सेवा गृहीत धरली जाणार नसून त्यांच्यावर कमी वसुलीचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सरकारने राज्यातील महापालिका जकातकर रद्द करून त्याऐवजी एलबीटी करप्रणाली सुरू केली. एलबीटी करप्रणालीद्वारे पालिकेने तब्बल १५ हजार व्यापाऱ्यांची नोंदणी केली. मात्र, बहुतांश व्यापाऱ्यांनी वार्षिक विवरणपत्र सादर न केल्याने, त्यांची करनिर्धारणा झाली नाही. त्यामुळे एलबीटीचे उत्पन्न जकातीपेक्षा कमी झाले. कमी वसुलीचा ठपका तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी ठेवून १६ कर्मचाºयांना निलंबित, तर ५० कर्मचाºयांना नोटीस दिल्या. याप्रकाराने एलबीटीतील सावळागोंधळ ऐरणीवर आला. कमी वसुलीमुळे दरमहा आठ ते नऊ कोटी तर वर्षाला १०० कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप मनसेने केला.

मनसेने महापालिका एलबीटी विभागातील भ्रष्टाचाराची तक्रार नगरविकासमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश तत्कालीन आयुक्तांना दिले. त्यानुसार, सेवानिवृत्त उपसचिव कैलास बोधडे यांच्यांतर्गत चौकशी सुरू होऊन चौकशीत १६ कर्मचारी अंशत: दोषी आढळले. दोषी कर्मचाºयांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर, आयुक्त अच्युत हांगे यांनी त्यांचे निलंबन कायम ठेवून त्या दोन वर्षांची सेवा गृहीत धरली जाणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. पालिका अधिकारी, व्यापारी व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतातून एलबीटी विभागात २०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला होता. गेल्याच महिन्यात महापालिका एलबीटी विभागाने पुन्हा वार्षिक विवरणपत्र सादर न करणाºया दुकानदारांना नोटिसा पाठवून एलबीटीअंतर्गत कर भरण्याचे आदेश दिले आहेत.२०० कोटींचे नुकसानएलबीटी करप्रणालीमुळे महापालिकेचे २०० कोटींचे नुकसान झाल्याचे उघड झाले. जकातीपासून दरमहा १६, तर एलबीटी करप्रणालीद्वारे सात ते आठ कोटींची वसुली झाली. म्हणजे दरमहा आठ तर दोन वर्षांत २०० कोटींचे नुकसान झाले आहे. महापालिका अधिकारी, नगरसेवक व व्यापारी यांच्या संगनमतानुसार एलबीटीकर कमी वसूल झाल्याचा आरोप झाला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे