शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत मेट्रो मार्ग १५०० कोटींचा, जर्मन बँकेकडून घेणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 04:10 IST

ठाणे शहराच्या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाऱ्या अंतर्गत मेट्रोने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले असून महापालिका, राज्य शासन, केंद्र शासन यांच्या निधीसोबतच जर्मन बँकेची मदत घेण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाणे : ठाणे शहराच्या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाऱ्या अंतर्गत मेट्रोने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले असून महापालिका, राज्य शासन, केंद्र शासन यांच्या निधीसोबतच जर्मन बँकेची मदत घेण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. या मेट्रोचा खर्च सुमारे १५०० कोटींच्या आसपास असल्याने पालिकेने हे पाऊल उचलले आहे. मेट्रोच्या या मार्गात २२ स्थानके असणार असून २५ किमीचा हा मार्ग असणार आहे. तसेच मुख्य मेट्रोलासुद्धा ही कनेक्ट केली जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास भविष्यात सुखकारक होणार आहे.अंतर्गत मेट्रोसाठी नवीन रेल्वेस्टेशनपासून मॉडेला चौक, मेन रोड वागळे, रोड नं. २२, लोकमान्यनगर टीएमटी डेपो, देवदयानगर, शास्त्रीनगर, उपवन तलाव, पोखरण रोड नं. २, गांधीनगर जलकुंभ, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह यासह संपूर्ण शहरास फायदेशीर ठरेल, अशी मार्गिका निश्चित करण्यात आली आहे. या मार्गिकेत २२ स्थानके असणार आहे.शहरातील २५ किमीचा हा मार्ग असणार असून ठाणे स्टेशनपासून ही मेट्रो बाहेर पडणार आहे. यासाठी सुमारे १५०० कोटींच्या खर्चासाठी राज्य शासन, केंद्र शासनाकडेदेखील निधी मागितला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी जर्मन बँकेचे प्रतिनिधी पालिकेत येऊन गेले. त्यांनी या मार्गाची पाहणी केली असून हा मार्ग किफायतशीर आहे किंवा नाही, याची चाचपणी केली. कर्ज द्यायचे अथवा नाही, याचा अहवाल काही दिवसांत देणार आहेत. त्यानंतर, पालिका यासंदर्भातील प्रस्ताव महासभा आणि दुसरीकडे केंद्राकडेदेखील अंतिम मंजुरीसाठी पाठवणार आहे. यानंतर मेट्रोचा मार्ग मोकळा होणार आहे.बांधकामे बाधित होणारया मार्गात एक हजाराहून अधिक बांधकामे बाधित होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. सुरुवातीच्या स्थानकापासून ३० मीटर खाली म्हणजेच सिडको ते नवीन रेल्वेस्टेशनपर्यंतचा या मेट्रोचा मार्ग हा भुयारी असणार आहे. परंतु, त्यापुढील मार्ग हा रस्त्याच्या वरून जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणे