शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डनपाठोपाठ १५० होमगार्ड

By admin | Updated: July 20, 2015 03:19 IST

वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राखण्यासाठी होमगार्ड मिळावे, या मागणीला शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर दोन महिन्यांतच १५० होमगार्डची फौज शहर

पंकज रोडेकर, ठाणे वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राखण्यासाठी होमगार्ड मिळावे, या मागणीला शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर दोन महिन्यांतच १५० होमगार्डची फौज शहर आयुक्तालयात दाखल झाली असून ते वाहतूककोंडी सोडविताना दिसू लागले आहेत. आयुक्तालयातील पाच परिमंडळांत त्यांची विभागणीही केली असून भिवंडी आणि ठाण्यात प्रत्येकी ५० होमगार्ड दिले आहेत. वॉर्डनपाठोपाठ होमगार्डही मिळाल्याने वाहतूककोंडी सोडविण्यात मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची हद्द जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि कुळगाव-बदलापूर तसेच अंबरनाथ नगरपालिका अशा सहा स्थानिक स्वराज्य संस्थांभोवती पसरली आहे. तसेच वाहतूककोंडीसाठी २२ वाहतूक उपशाखा असून मंजूर ७६५ मनुष्यबळापैकी ६८९ तैनात आहे. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवलीत ७५ तर उल्हासनगरमध्ये २५ वॉर्डन तैनात आहेत. दिवसेंदिवस वाढणारे नागरीकरण आणि वाहनांची संख्या, अरुंद व खराब रस्ते, त्यांची दुरुस्ती तसेच स्थानिक प्राधिकरणाची सार्वजनिक वाहतूक, त्याचबरोबर खाजगी कंपन्या व मोठ्या नागरी वसाहतींची स्वतंत्र बससेवा, रिक्षा, टॅक्सी आणि महामार्गावर दिवसरात्र होणारी जड-अवजड वाहनांची वर्दळ, शहरातील वाढत्या मॉलच्या संख्येमुळे तसेच अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे मुख्य तसेच सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग या सर्वच गोष्टींमुळे वाहतुकीची दिवसेंदिवस समस्या जटील झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी शहर पोलिसांनी २०० होमगार्ड मिळावे, अशी मागणी राज्य शासनाकडे लावून धरली होती. त्यानुसार, शासनाने होमगार्ड देण्याचे मान्य केले होते. त्यातील १५० होमगार्ड वाहतूक विभागात दाखल झाले आहेत.