शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गौरी गणपती विसर्जनावेळी १५ टन निर्माल्‍य संकलित, थर्माकॉलचा वापर शुन्य

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 6, 2022 17:09 IST

थर्माकॉलचा वापर शून्य तर अविघटनशील घटकांचे प्रमाण कमी

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ठाणेकरांनी यंदा थर्माकॉलचा शून्य वापर केल्याचे तसेच, अविघटनशील घटकांचा कमीत कमी वापर केल्याचे आढळून आले आहे. गणेशोत्सव काळात सुरू असलेल्या निर्माल्य संकलन मोहिमेत समर्थ भारत व्यासपीठाने वरील निरीक्षण नोंदविण्यात आले. तसेच, या मोहिमेत गौरी गणपती विसर्दनावेळी १५ टन निर्माल्याचे तर आतापर्यंत ३७ टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले आहे. 

समर्थ भारत व्‍यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विदयमाने गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍याचे संकलन करणे व त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्‍या वर्षात पदार्पण केले. यंदा दिड दिवसाच्‍या गणपती विसर्जनात जवळपास १० टन तर पाचव्या दिवसांच्या गणपती विसर्जनात १२ टन तर गौरी गणपती विसर्जनावेळी १५ टन निर्माल्‍य संकलित करण्यात आले. तलावांचे शहर असलेल्‍या ठाण्‍याने गणपती काळातील निर्माल्‍य व्‍यवस्‍थापनासाठी देखील गेल्‍या बारा वर्षांपासून महानिर्माल्‍य व्‍यवस्‍थापन अभियान राबविले आहे. शहरातील जवळपास ७ विसर्जन घाटावर दरवर्षी सफाई सेवक व कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातून गणेश भक्‍तांकडून निर्माल्‍य व सजावटीचे साहित्‍य संकलित केले जाते. विसर्जन घाटावर तैनात करण्‍यात आलेल्‍या वाहनांमध्‍ये या निर्माल्‍याचे जैविक व अजैविक असे वर्गीकरण केले जाते. वर्गिकृत कचरा समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या संयुक्‍त कचरा व्‍यवस्‍थापनावर पाठवला जातो. जैविक कचऱ्यातून खत निर्मिती केली जाते तर अजैविक कच-यात असलेल्‍या प्‍लास्‍टीक, कागद, पुठठा, काच, कागद सारखे घटक देखील संस्‍थेच्‍या प्रकल्‍प पुर्ननिर्माणमध्‍ये शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाटीसाठी पाठवले जातात.

गेल्‍या १२ वर्षापासुन समर्थ भारत व्‍यासपीठ हा उपक्रम राबवित आहे. शहरातील सफाई सेवक महिला व संस्‍थेचे कार्यकर्ते गणेशोत्‍सव अधिक पर्यावरण पुरक व्‍हावा यासाठी जन जागृती करत असतांनाच प्रत्‍यक्ष निर्माल्‍य संकलन व त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लागावी म्‍हणून एक महिना या महानिर्माल्‍य अभियानात कार्यरत असतात. दिड दिवस, पाच दिवस आणि सहा दिवसांच्याच्‍या विसर्जनात जवळपास ३७ टन निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. कोविड नंतर यंदाचा गणेशोत्‍सव मोठया उत्‍साहात साजरा होत आहे. त्‍यामुळे निर्मालयाचे प्रमाण यंदा वाढले आहे. थर्माकोलचा वापर शून्.य तर प्‍लास्‍टीकचा वापर ८० टक्‍के कमी झालेला यावर्षी दिसला अशी माहिती संस्‍थेच्‍यावतीने देण्‍यात आली. संपुर्ण गणेशोत्‍सवात किमान १०० टन निर्माल्‍य संकलित होईल असा अंदाज संस्‍थेच्‍यावतीने व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे. त्‍याचे देखील शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावली जाईल असा निर्धार समर्थ भारत व्‍यासपीठाने व्‍यक्‍त केला आहे.

टॅग्स :thaneठाणेGanpati Festivalगणेशोत्सव