शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक महिलेस १.४७ लाखांचे वीजबिल, महावितरणचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 07:39 IST

चौधरी यांच्या घरी त्या, पती गजानन व मुलगा असे तिघेच राहतात. एलईडी लाइट, एक वॉशिंग मशीन, एक एसी इतकाच त्यांच्या घरात विजेचा वापर आहे.

डोंबिवली : एमआयडीसीतील मिलापनगरमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक गौरी चौधरी यांना महावितरणने एक लाख ४७ हजार २५० रुपयांचे वीजबिल पाठवले आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्काच बसला आहे.चौधरी यांच्या घरी त्या, पती गजानन व मुलगा असे तिघेच राहतात. एलईडी लाइट, एक वॉशिंग मशीन, एक एसी इतकाच त्यांच्या घरात विजेचा वापर आहे. त्यामुळे इतके वीजबिल आले कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या बिलाबाबत गजानन यांनी महावितरणच्या कार्यालयात चौकशी केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना हे बिल योग्य असून, ते तीन समान हप्त्यांत भरा, असे सांगितले आहे. परंतु, पहिला हप्ताच ४९ हजारांचा असून, त्यांना तीन समान हप्त्यांत बिल भरणे शक्य नाही. मात्र, बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित होईल, या विवंचनेत चौधरी कुटुंब सापडले आहे.चौधरी यांच्याप्रमाणेच मिलापनगरात राहणारे ज्येष्ठ नागरिक अजय देसाई यांनाही ७० हजार १४० रुपयांचे वीजबिल आले आहे. तेही बिल कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. त्यांनाही तीन समान हप्त्यांत बिल भरण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांनाही बिल भरणे शक्य नाही. हे जरी सहा महिन्यांचे सरासरी बिल असले, तरी सरासरी येणारी ठरावीक रकमेची बिले त्यांनी आतापर्यंत भरली आहेत.दरम्यान, काही दिवसांपूर्वी कल्याणमधील भाजप आमदारांचे वीजबिल कमी करण्यात आले होते. तोच न्याय सामान्य नागरिकांच्या वाढीव बिलांबाबत का दिला जात नाही, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांकडून केला जात आहे. वाढीव बिलांच्या विरोधात भाजप, शिवसेनेकडून आंदोलने करण्यात आली. तरीही, महावितरणने वाढीव बिलांबाबत दिलासा दिलेला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना ‘शॉक’च बसला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली