शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

तीन तालुक्यांतून १४४ टन काजू निर्यात

By admin | Updated: May 9, 2016 01:52 IST

कोकणातील प्रसिध्द आणि जगभरात लोकप्रिय असलेल्या ड्रायफ्रूट काजू व त्याचे बी याची जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातून

जव्हार : कोकणातील प्रसिध्द आणि जगभरात लोकप्रिय असलेल्या ड्रायफ्रूट काजू व त्याचे बी याची जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातून १४४ टन निर्यात झाल्याचे व्यापारी सुशील सहाने यांनी लोकमतला सांगितले. जव्हार हे संस्थान कालीन शहर आहे, येथील श्रीमंत राजे यांनी आपल्या महलाच्या २० ते २५ एकरात काजूची बागायत लावली आहे. त्यामुळे काजूचे दरवर्षी जवळ जवळ ५००० किलोचे उत्पादन या एकट्या बागेतून निघत असते. याकरीता काही व्यापारी या बागेची सिझनपूर्वीच बोली करून माल खरेदी करतात. तालुक्यातील खेडोपाड्यात प्रकल्प कार्यालयामार्फत फळबाग योजनेतून तसेच बायफ मित्र व इतर संस्थांच्या मदतीने काजूची हजारो रोप देऊन बाग तयार करण्यात आलेल्या आहेत, यातूनही भल्या मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन निघते, त्यामुळे येथील शेतकरी आपल्या छोटेखानी बागेतूनही बरेच उत्पादन घेतात. दरवर्षाप्रमाणे यंदाच्या सिझनला काजू बी चे उत्पादन चांगले झालेले असल्यामुळे शेतकरी व व्यापारी आनंदात आहेत. छोटी बी ८० ते १०० रू किलो तर मोठे बी ९५ ते १२० मध्ये विकली जात असल्याने भावही चांगला मिळतो आहे. (वार्ताहर)