शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१४०० विद्यार्थी हवालदिल

By admin | Updated: June 16, 2016 01:08 IST

ठाणे महापालिकेने नाल्यावरील बांधकामांवर हातोडा टाकण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून सुरू केली. त्यानुसार, आतापर्यंत सुमारे ७० बांधकामांवर हातोडा टाकल्यानंतर पालिकेने गडकरी

ठाणे : ठाणे महापालिकेने नाल्यावरील बांधकामांवर हातोडा टाकण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून सुरू केली. त्यानुसार, आतापर्यंत सुमारे ७० बांधकामांवर हातोडा टाकल्यानंतर पालिकेने गडकरी रंगायतनसमोर असलेल्या अधिकृत शिवसमर्थ माध्यमिक विभागाची शाळा येत्या २४ तासांत रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारची नोटीस हाती पडल्याने शाळा व्यवस्थापनाबरोबर येथे शिक्षण घेत असलेले सुमारे १४०० विद्यार्थी चक्रावले आहेत. नाल्यावरील बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर शहरातील विविध भागांत नाल्यांवर असलेल्या बांधकामांचा सर्व्हे करून त्यावर कारवाईस सुरुवात केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत सुमारे ७० बांधकामांवर कारवाई केली आहे. गडकरी रंगायतनच्या समोर असलेल्या शिवसमर्थच्या माध्यमिक शाळेलाही अशीच नोटीस बजावली आहे. यात शाळेची इमारत नाल्यावर असल्याचे सांगण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही नोटीस बजावली. परंतु, याची माहिती शाळा व्यवस्थापन आणि विश्वस्तांना बुधवारी झाल्याने सर्व व्यवस्थापनच हादरून गेले. प्रत्यक्षात ही शाळा १९७८ च्या सुमारास उभारण्यात आली असून तिचे काही महिन्यांपूर्वी स्ट्रक्चरल आॅडिटदेखील केले आहे. या आॅडिटनुसार ही शाळा आणखी १० वर्षे व्यवस्थित राहू शकते, असा अहवाल आहे.पालिकेने अचानक अशा प्रकारची नोटीस बजावल्याने तेदेखील चक्रावले आहेत. त्यानुसार, या विश्वस्तांनी तत्काळ महापौर संजय मोरे यांनी भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. यासंदर्भात अतिक्रमण विभागाशी चर्चा करून ही नोटीस मागे घेण्यास सांगितल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली. तर, शाळा व्यवस्थापनाने यासंदर्भात महापालिकेशी पत्रव्यवहार केला असून अतिक्रमण विभागानेदेखील नोटीस मागे घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शाळेच्या विश्वस्तांनी दिली. आता पुढे काय होते, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.