शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

१४० एक्स्प्रेसना राजधानी-शताब्दीचे रूप, मध्य रेल्वेच्या ११, तर प.रे.च्या २० गाड्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 06:23 IST

देशभरातील १३२ मार्गांवरील १४० लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचा राजधानी-शताब्दी एक्स्प्रेसच्या धर्तीवर चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला

नारायण जाधवठाणे : दख्खनची राणी (डेक्कन क्वीन), नेरळ-माथेरान टॉय ट्रेनसह देशभरातील १३२ मार्गांवरील १४० लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचा राजधानी-शताब्दी एक्स्प्रेसच्या धर्तीवर चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यात सर्वांच्या आवडीच्या आणि देश-विदेशांतील पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या नेरळ-माथेरान टॉय ट्रेनला तर काचेचे छप्पर बसवून, एका डब्यात रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार आहे.या योजनेत मध्य रेल्वेच्या १२ मार्गांवरील ११ गाड्या आणि पश्चिम रेल्वेच्या १४ मार्गांवरील २० गाड्यांचा समावेश आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत या कामास सुरुवात होणार आहे. वर्षभरात सर्व गाड्या नव्या रूपात धावतील, असा विश्वास रेल्वे सूत्रांनी व्यक्त केला.या असणार सुविधाया सर्व गाड्यांच्या सीटचे कुशन बदलण्यात येणार असून त्यांना शताब्दी-राजधानीचा टच देण्यात येणार आहे.सर्व गाड्यांमध्ये आगीच्या दुर्घटना घडल्यास मोठी हानी टाळण्यासाठी आगप्रतिबंधक यंत्रणा, मार्गावरील विविध स्थळांची माहिती देणारे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. याशिवाय, प्रसाधनगृहात उच्च दर्जाचे फ्लशर्स बसवण्यात येणार असून त्यांची प्रत्येक दोन तासांनंतर स्वच्छता करण्यात येणार आहे. शिवाय, सर्व डब्यांची अधूनमधून सफाई करून ठिकठिकाणी केराच्या टोपल्या ठेवण्यात येणार आहेत.गाडी सुरू झाल्यानंतर प्रत्येक दोन तासांनंतर तिच्या देखभाल दुरुस्तीची तपासणी करण्यात येणार आहे. खिडक्यांचे पडदे बदलून ते आकर्षक करण्यात येणार आहेत. चांगली व शुद्ध हवा खेळती राहावी, यासाठी व्हेंटिलेशनची रचना बदलण्यात येणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरील दख्खनची राणी १५ आॅगस्टपर्यंत, तर मुंबई-मडगाव ही गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची आवडती गाडी डिसेंबरपर्यंत नव्या रूपात धावणार आहे. रेल्वे कर्मचाºयांना हजेरीसाठी जीपीएस टॅग लावण्यात येणार आहेत.टॉय ट्रेनचे सिलिंगबनवणार काचेनेदेश-विदेशांतील पर्यटकांचे मुंबईनजीकचे आवडते पर्यटन आणि थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान होय. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगेतीलमाथेरानला जाण्यासाठी नेरळ येथून टॉयट्रेन आहे. या ट्रेनने माथेरानला जाताना तेथील निसर्गसौंदर्याचे पॅनारोमिक दृश्य टिपण्यासाठी या गाडीचे सिलिंग संपूर्ण काचेचे करण्यात येणार आहे. शिवाय, गुगल आर्ट आणि कल्चरशी सहकार्य करार करून परिसराच्या पॅनारोमिक इमेज दाखवणारी डिजिटल डॉक्युमेंटची थीम तयार करून या लोकप्रिय गाडीला आणि माथेरानला जागतिक स्तरावर वेगळी ओळख देण्यात येणार आहे. शिवाय, या टॉयट्रेनच्या एका डब्यात आकर्षक असे रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार असल्याने पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.