शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल सोनसाखळी चोरणाऱ्या दुकलीकडून १४ गुन्हे उघडकीस ; त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू 

By अजित मांडके | Updated: June 26, 2023 15:34 IST

त्या गुन्ह्यातील २६० ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात  यश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडीत धूम स्टाईलने मोटारसायकल वरून सोनसाखळी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल सोनसाखळी चोरट्यांना भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी तब्बल १४ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्या गुन्ह्यातील १३ लाख रुपयांचे एकूण २६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर ऐवज त्यांच्याकडून हस्तगत केले आहे. तर त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

        गुन्हेगार वॉच करण्यासह आणि हायवे रॉबरी चोरीस प्रतिबंध करण्यासाठी भिवंडी परिमंडळ-२ परिसरात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची पेट्रोलींग सुरू असताना, साईबाबा मंदिरासमोरील रोडवर कल्याण बाजुकडुन भिवंडी बाजुकडे जाणाऱ्या रोडवरून काळया रंगाच्या मोटार सायकलवरून संशयास्पदरित्या भरधाव वेगात आलेल्या भिवंडी, शांतीनगर रोड येथील मोहझम नवाज शरीफ अन्सारी (२८) आणि नियाज अहमद हुसेन शेख (३२) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी साथीदारांसह भिवंडी शहरात केलेल्या गुन्हयांची कबुली दिली. भिवंडी परिमंडळ-२ मधील १२ गुन्हयांसह भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्हे असे एकुण १४ गुन्हे उघडकीस आले. तसेच त्यांच्याकडून एकुण २६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व इतर ऐवज जप्त केला असून त्याची एकूण किंमत १३ लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या त्या दोघांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

ही कामगिरी भिवंडी गुन्हे शाखा घटक-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय मोरे, प्रफुल्ल जाधव, धनराज केदार, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी, निसार तडवी, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव, रविंद्र पाटील, राजेश शिंदे, पोलीस हवालदार गंगेश शिर्के, साबीर शेख रंगनाथ पाटील, सुनिल साळुखे, शशिकांत यादव, प्रकाश पाटील, देवानंद पाटील, किशोर थोरात, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस शिपाई सचिन सोनवणे, अमोल इंगळे, जालींदर साळुंखे,  रोशन जाधव, प्रशांत बर्वे, भावेश घरत आणि माया डोंगरे, श्रेया खताळ यांनी केलेली आहे.