शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कंपनीद्वारे १४ जणांची फसवणूक, कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:13 IST

तालुक्यात येऊन साऊथ आफ्रिकेची पैसे दुप्पट करणारी कंपनी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक केल्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कर्जत : तालुक्यात येऊन साऊथ आफ्रिकेची पैसे दुप्पट करणारी कंपनी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक केल्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कर्जत येथे सेमिनार घेऊन १४ लोकांकडून तब्बल १ कोटी १९ लाख ५६ हजारांची रक्कम घेऊन बोगस कंपनीच्या संचालकांनी पोबारा केला आहे. रायगड पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला आहे.जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कर्जत तालुक्यात येऊन साऊथ आफ्रिकेच्या बोगस कंपनीच्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दापाश केला आहे. त्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमांचा आधार घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील तीन तरुणांनी साऊथ आफ्रिकेत कंपनी असल्याचे भासवून त्या कंपनीची बनावट वेबसाइट तयार केली. पुण्याच्या गोकुळनगर भागातील सोनू सोपान वाडकर आणि हवेली मांजरी येथील महेश तुकाराम झगडे या दोघांनी प्रिन्स अग्रवाल या सॉफ्टवेअर इंजिनियर तरु णाला हाताशी धरले. तिघांनी www.parcypto.org ही वेबसाइट तयार करून घेतली. ही वेबसाइट साऊथ आफ्रिकेत असलेल्या कंपनीची असून, ती कंपनी एक वर्षात पैसे दुप्पट करते, असे सांगून त्या तिघांनी कर्जत येथील राज कॉटेज हॉटेलमध्ये गुंडगे भागातील अभय भीमा पवार (३२) यांच्याशी कंपनीबाबत ९ सप्टेंबर २०१६ रोजी प्रथम चर्चा केली. त्यानंतर आपल्या बनावट असलेल्या परदेशी कंपनीचे नाव वापरून अनेकांना आकर्षित केले. त्या कंपनीचे एक सेमिनार देखील कर्जतमध्ये पार पडले होते.पैसे दुप्पट होणार म्हणून त्या १४ लोकांनी १ कोटी १९ लाख ५६ हजार एवढी रक्कम साऊथ आफ्रिकेत कार्यालय असलेल्या कंपनीत गुंतवली. हा सर्व व्यवहार त्या तिघांनी जानेवारी २०१७ पर्यंत करताना सर्वांकडून चेकद्वारे रक्कम स्वीकारली होती. मात्र सप्टेंबर महिना आला तरी आपल्या खात्यात कंपनीने डबल झालेले पैसे जमा केले नाहीत म्हणून कर्जत गुंडगे येथील तरु ण अभय भीमा पवार हा कंपनीच्या त्या तिघा संचालकांना फोन करू लागला. त्यांचे कोणाचेही फोन लागत नसल्याने शेवटी पवार याने कर्जत पोलीस ठाणे गाठले. ८ नोव्हेंबर रोजी आर्थिक फसवणूक झालेली तक्र ार जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने दाखल करून तपास सुरू केला आहे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए. ए. जगदाळे तपास करत आहेत.