शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत खड्डे भरण्यासाठी १३.९० कोटींचे कंत्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 17:52 IST

शहरातील रस्ते जूनमध्ये झालेल्या पावसात वाहुन गेल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या महापालिकेत खड्डे बुजवण्यासाठी खडी-मातीचा भराव टाकण्यासह पावसाने उघडीप घेतल्यावर आवश्यकतेनूसार डांबरीकरण करण्यासाठी १३.९० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे टेंडर करावे लागले दोन वेळा रिकॉल  डोंबिवलीसाठी ६.९० कोटींची तरतूद

डोंबिवली: शहरातील रस्ते जूनमध्ये झालेल्या पावसात वाहुन गेल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या महापालिकेत खड्डे बुजवण्यासाठी खडी-मातीचा भराव टाकण्यासह पावसाने उघडीप घेतल्यावर आवश्यकतेनूसार डांबरीकरण करण्यासाठी १३.९० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे.त्यापैकी डोंबिवलीसाठी ६ कोटी ९० लाखांची तरतूद असल्याची माहिती डोंबिवली विभागीय अभियंता प्रशांत भुजबळ यांनी दिली. त्यामध्ये शहरातील ह, फ, ग, आय आणि जे असे पाच प्रभाग मिळून काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. हे कंत्राट मार्च महिन्या दरम्यान येणे अपेक्षित होते परंतू प्रतिसादाआभावे दोन वेळा रिकॉल करावे लागले तसेच त्यानंतर पालघर आणि कोकण पदवीधर मतदार संघ आदींच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागली. त्यामुळे खड्डे भरण्यासह अन्य कामाना वेळ लागल्याचे ते म्हणाले.आता आय प्रभागासह ह प्रभागात त्या कामासाठी दोन एजन्सी काम करत असून ग फ व जे मध्ये प्रत्येकी एक एजन्सी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. त्या कामांवर संबंधित ठिकाणचे उपअभियंता लक्ष देत असल्याचे ते म्हणाले. पावसाच्या दिवसांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्डे पडतात ते भरण्यासाठी खडी-चिकणमाती टाकुन भरण्याचे काम सर्वत्र सुरु आहे, पण पावसाचा जोर बघून कामे करावी लागत असून पावसाच्या संततधारीमुळे चार-पाच दिवस कामावर परिणाम झाला आहे. आता आगामी काळात उघडीप मिळाल्यावर खड्डे बुजवण्याच्या कामाला जोर लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली