शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

१३७ कोटींचा धान्यखरेदी घोटाळा; व्यवस्थापकासह तीन अधिकारी निलंबित !

By सुरेश लोखंडे | Updated: June 20, 2023 18:52 IST

आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश

ठाणे : आदिवासी विकास महामंडळाच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात धान खरेदीमध्ये अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचा केला आहे. आमदार संजय केळकर यांनी या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर या भ्रष्टाचारातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

या अधिकाऱ्यांची लाच लुचपत विरोधी विभागामार्फत चौकशी करण्याची मागणीही केळकर यांनी केली आहे.    महामंडळाच्या शहापूर कार्यालयामार्फत २०१९-२० ते २०२१-२२ या हंगामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांनी केळकर यांच्याकडे केल्या होत्या. या धान्यखरेदी योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार अधिकारी, व्यापारी आणि राष्ट्रवादीच्या एका लोकप्रतिनिधीच्या संगनमताने झाल्याचा आरोप केळकर यांनी करून या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे केली होती. त्यानुसार आताही धडक कारवाई हाेऊन तीन अधिकार्यांना निलंबित केले आहे.

आदिवासी विकास महामंडळाच्या स्थानिक अधिकारी आणि राष्ट्रवादीच्या एका लोकप्रतिनिधीच्या संगनमताने १३७ कोटी रुपयांची धानखरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. दुसरीकडे रोज एक ते पाच हजार क्विंटलपर्यंत खरेदी दाखवण्यात आली. इतर राज्यातील तांदूळ आणून कागदोपत्री धान्य जावक दाखवली आहे. दोन वर्षांत अनुक्रमे ४४ हजार क्विंटल आणि दाेन लाख ५० हजार क्विंटल घट आली. बोगस धान्य खरेदीचा घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणून स्थानिक पातळीवर सक्षम मिलर्स असताना जळगाव आणि औरंगाबाद येथील मिलर्सना भरडाईचे काम देण्यात आल्याचा आरोप केळकर यांनी केला होता. त्याशिवाय त्यांनी हा विषय सातत्याने विधानसभेत मांडून दोषींविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. अखेर प्रशासनाने उच्चस्तरीय समिती नेमून अहवाल सादर केला. या अहवालात गंभीर बाबी उघड झाल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या नावावर २०२०-२१ या हंगामात पाच हजार ६३३ क्विंटल भाताची खरेदी न करता त्याच्या कागदोपत्री नोंदी करण्यात आल्या. रब्बी खरेदीमध्ये धानाची लागवड केली नसताना, शेतकऱ्याच्या नावावर पिकपेरा नसताना बोगस खरेदी दाखवण्यात आली. धानाची उचल होताना दुचाकीवर धानाची वाहतूक केल्याचे दाखवण्यात आले. तसेच केंद्रव्यातिरिक्त इतर ठिकाणी धान साठवणूक करण्यात आली. अनधिकृतपणे धान खरेदी करण्यात आल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे.या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई 

 या भ्रष्टाचार प्रकरणी राज्य शासनाच्या निधीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केल्याने प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, आशिष वसावे, अविनाश राठोड आणि गुलाब सद्गिर या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे यापुढे गरजु शेतकऱ्यांकडील धांनखरेदी केली जाईल आणि शेतकर्यांना न्याय दिला जाईल, अशी अपेक्षा केळकर यांनी केली आहे.