शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बायोमायनिंगच्या प्रकल्पाकरिता १३७ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST

कल्याण : कल्याणमधील वादग्रस्त आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बायोमायनिंग पद्धतीने बंद करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव ...

कल्याण : कल्याणमधील वादग्रस्त आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बायोमायनिंग पद्धतीने बंद करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव १३७ कोटी रुपये खर्चाचा आहे. त्याला निधी मिळावा, यासाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळताच आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

गतवर्षी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली होती. मे २०२० मध्ये डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने आरोग्य सेवासुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले गेले. त्यामुळे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मागे पडला. दरम्यान, आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा कचरा बायोमायनिंग पद्धतीने नष्ट करून त्या जागेवर गार्डन विकसित केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले होते. त्यासाठी महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. बायोमायनिंगकरिता आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे भिवंडी येथील गावात रिकाम्या दगडखाणीची मागणी केली होती. खाण ठरली आहे. मात्र, त्या गावातील ग्रामस्थांची ग्रामसभा कोरोनामुळे न झाल्याने ग्रामसभेची मान्यता मिळालेली नाही. मात्र, महापालिकेने बायोमायनिंगकरिता १३७ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. एप्रिल २०२१मध्ये या प्रस्तावास राज्य सरकारकडून मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली.

...........

४०० टन कचऱ्यावर हाेते प्रक्रिया

महापालिकेने उंबर्डे येथे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प उभारला आहे. त्याचबरोबर प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून इंधन तयार करणे, कचऱ्यापासून खत तयार करणे, कापडी कचऱ्यापासून पिशव्या तयार करणे, या विविध उपाययोजनांमुळे आजघडीला डम्पिंग ग्राउंडवर केवळ ६० ते १०० टन इतकाच कचरा जात आहे. उर्वरित ४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आला.

........

महापालिका हद्दीत ज्या बड्या सोसायट्या आणि इमारती आहेत, त्यांना बांधकाम परवानगी देताना पर्यावरण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्या प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित सोसायट्यांनी त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे. त्यानुसार, मागच्या आठवड्यात बालाजी गार्डनचा कचरा उचलणे बंद करण्यात आले होते. त्यांना चार दिवसांची मुदतवाढ दिली होती. शहरातील अशा २३ बड्या सोसायट्यांना घनकचरा व्यवस्थापन विभागाने पुन्हा कचरा न उचलण्याची नोटीस दिली आहे. त्यांनी प्रक्रिया प्रकल्प सोसायटीत उभारावा, असे आदेश दिले आहेत. त्यापैकी तीन सोसायट्यांनी त्यांच्या सोसायटीतील कचऱ्यावर स्वत: प्रक्रिया करणे सुरू केले आहे. त्यामुळे जवळपास ४० टन कचरा डम्पिंग ग्राउंडवर जात नाही.

----------------