शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यात १३४ तर उथळसरमध्ये १०६ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:06 IST

धोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू : मे अखेरीस घरे सोडा, अन्यथा सक्तीने बाहेर काढण्याचा दिला इशारा

ठाणे : पावसाळा दीड महिन्यावर आल्याने ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण केला असून कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत १३४, तर उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीत असलेल्या १०६ धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. कळव्यात दोन अतिधोकादायक इमारती असून उथळसरमध्ये चार अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत नागरिकांनी स्वत:हून इमारती रिकाम्या न केल्यास प्रशासनाच्या वतीने लोकांना घराबाहेर काढावे लागेल, असा इशारा पालिकेने दिला आहे.ठाणे शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता क्लस्टर योजना लागू करणे गरजेचे आहे. तसा तत्त्वत: निर्णय घेतला असला, तरी क्लस्टरच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. दीड महिन्यानंतर पावसाला सुरु वात होताच शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे सालाबादप्रमाणे महापालिकेच्या अतिक्र मण विभागाच्या वतीने संपूर्ण शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे.शासनाच्या वतीने धोकादायक इमारतींबाबत जे धोरण ठरवून दिले आहे, त्या धोरणानुसारच यावर्षी सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये सी-१ श्रेणीमध्ये अतिधोकादायक इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. सी-२ ए मध्ये इमारत रिकामी न करता दुरुस्त करण्याजोग्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. सी-२ बी श्रेणीमध्येसुद्धा इमारत रिकामी न करता दुरु स्त करणे शक्य असलेल्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. तर, सी-३ या श्रेणीमध्ये ज्या इमारतींची किरकोळ दुरु स्ती करायची आहे, अशा इमारतींचा समावेश आहे.ठाण्यातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्णकळवा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक इमारतींची संख्या चार होती, तर उथळसरमध्ये हीच संख्या सात होती. अतिक्र मण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये कळव्यातील अतिधोकादायक इमारतींची संख्या दोनने तर उथळसरमध्ये ही संख्या तीनने कमी झाली आहे.प्रभाग समितीनिहाय यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरूआता सर्व इमारतींचा सर्व्हे करण्यात आला असून प्रभाग समितीनिहाय यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती अतिक्र मण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली आहे. मे पर्यंत संपूर्ण प्रभाग समितीनिहाय इमारतींची माहिती आल्यानंतर नागरिकांनी इमारती दुरु स्त न केल्यास किंवा इमारती रिकाम्या न केल्यास प्रशासनाच्या वतीने या इमारती रिकाम्या केल्या जातील, असे अतिक्र मण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणे