शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१३ दाम्पत्ये निवडणूक रिंगणात

By admin | Updated: February 9, 2017 04:00 IST

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षांतील १३ दाम्पत्य रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये पाच दाम्पत्य सलग दुसऱ्यांदा रिंगणात आहेत.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षांतील १३ दाम्पत्य रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये पाच दाम्पत्य सलग दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. तर, सर्वाधिक ५ जोड्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असून त्याखालोखाल शिवसेनेत ४, भाजपात ३ आणि काँग्रेस आणि मनसेत एकेक जोडी यंदा आपले नशीब आजमावत आहे. राष्ट्रवादीच्या वतीने प्रभाग क्र. २३ अ मधून मिलिंद पाटील, तर त्यांची पत्नी मनाली पाटील २५ ब मधून रिंगणात उतरले असून त्यांची ही दुसरी टर्म आहे. प्रभाग क्रमांक २३ क मधून पुन्हा एकदा केणी दाम्पत्य निवडणूक लढवत आहे. २००७ मध्येदेखील हे जोडपे एकत्र लढले होते. परंतु, त्या वेळेस निसटत्या मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर, २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा ते निवडून आले होते. आता पुन्हा प्रभाग क्र. २६ अ मधून अनिता केणे आणि त्यांचे पती राजन किणे हे प्रभाग क्र. ३१ ड मधून निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. तर, प्रभाग क्र. २४ ब मधून मनीषा साळवी आणि त्यांचे पती महेश साळवी हे २५ अ मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या खालोखाल आता प्रथमच प्रभाग क्रमांक २७ क आणि ड मधून विजय भोईर आणि त्यांच्या पत्नी संगीता भोईर या आपले नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादीपाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो तो शिवसेनेचा. शिवसेनेत चार दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्र. ४ अ मधून हरिश्चंद्र पाटील आणि त्यांची पत्नी कल्पना पाटील या प्रभाग क्रमांक ७ ब मधून रिंगणात आहेत. मागील निवडणुकीतही हे दाम्पत्य निवडून आले होते. प्रभाग क्र. ८ ब मधून उषा भोईर आणि त्यांचे पती संजय भोईर ड मधून उभे आहेत. हे दाम्पत्यदेखील दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहे. प्रभाग क्र १० ड मधून संजय तरे आणि ११ अ मधून त्यांची पत्नी महेश्वरी तरे या निवडणूक रिंगणात आहेत. २०१२ मध्येदेखील त्यांनी निवडणूक लढवली होती परंतु, त्यामध्ये संजय तरे यांचा पराभव झाला होता. प्रभाग क्र. १५ ब मधून एकनाथ भोईर आणि प्रभाग क्र. १७ अ मधून त्यांची पत्नी एकता भोईर या निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत एकनाथ भोईर यांचा पराभव झाला होता. प्रथमच स्वबळावर लढणाऱ्या भाजपामध्ये यंदा तीन दाम्पत्य नशीब आजमावणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक ४ क मधून आशादेवी शेरबहादूर आणि ड मधून त्यांचे पती शेरबहादूर सिंह, ११ ब मधून नंदा पाटील व त्यांचे पती कृष्णा पाटील हे ड मधून उभे आहेत. १५ अ मधून सुवर्णा कांबळे व त्यांचे पती विलास कांबळे हे ड मधून उभे आहेत. (प्रतिनिधी)