शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राच्या १२ कोटी आवर्तनाचा महासंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 05:34 IST

गीता फाउंडेशन, मिरजचे संस्थापक विश्वस्त दिलीप आपटे गुरुजी यांच्या वतीने श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राची १२ कोटी आवर्तने संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यांतून येत्या १० वर्षांत पूर्ण करण्याचा महासंकल्प के ला आहे.

- जान्हवी मोर्येठाणे : गीता फाउंडेशन, मिरजचे संस्थापक विश्वस्त दिलीप आपटे गुरुजी यांच्या वतीने श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राची १२ कोटी आवर्तने संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यांतून येत्या १० वर्षांत पूर्ण करण्याचा महासंकल्प के ला आहे. या महासंकल्पाला सुरुवात झाली आहे. या आवर्तनांची नोंद लिम्का बुक आॅफ रेकार्डमध्ये करण्याचा प्रयत्न असल्याचे या महासंकल्पाचे ठाणे गटप्रमुख सुनील देशपांडे यांनी सांगितले.सुमारे १२ कोटी श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राचा प्रयोग प्रथमच करण्यात येत आहे. संस्थेतर्फे यापूर्वी तीन हजार नागरिकांना घेऊन आवर्तनांचा प्रयोग केला होता. या आवर्तनपठणाला १ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या महासंकल्पात नागरिकांनी घरात दररोज किमान दोनदा (म्हणजेच महिन्यातून ६० वेळा) स्तोत्रपठण करायचे आहे. तसेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एकत्र जमून सामूहिक ठिकाणी आवर्तने करायची आहेत. यासाठी जातपात, स्त्री किंवा पुरुष असे कोणतेही बंधन नाही.संस्थेतर्फे २३ गटप्रमुख नेमण्यात आले आहेत. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून १२ हजार लोकांनी आपली नावनोंदणी केली आहे. त्यांनी आतापर्यंत ९०,२२३ आवर्तने केली आहेत. संस्थेने आपली एक वेबसाइट तयार केली आहे. त्या वेबसाइटवर प्रत्येकाने आपल्या आवर्तनांची नोंद करायची आहे. या वेबसाइटवर श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राचे महत्त्व, त्याचे फायदे सांगण्यात आले आहेत.श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्रामुळे आत्मविश्वास वाढतो. सामूहिक ठिकाणी सुरू असलेल्या आवर्तनाला दिलीप आपटे गुरुजी भेट देणार असून नागरिकांना त्यांच्या प्रवचनाचा लाभ मिळणार आहे. या महासंकल्पात जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. लोकसहभाग वाढल्यास हा महासंकल्प येत्या सहा वर्षांतच पूर्ण होईल, असा विश्वासही देशपांडे यांनी व्यक्त केला.ठाण्यातील विठ्ठल मंदिरात पठणठाण्यातील विठ्ठल मंदिरात १५ दिवसांपासून श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण केले जात आहे. हे पठण कल्याण, नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, सांगली, नाशिक अशा सर्वच ठिकाणी सुरू आहे. सध्या मराठी व कन्नड भाषिक आवर्तनेच पठण करत आहेत. कन्नडमधील तुमकुर आणि बंगळुरू येथे आवर्तनांचे पठण सुरू आहे.