शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाडमधील सिंगापूरचे १,२०० आदिवासी पोषण आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 02:05 IST

श्रमिक मुक्ती संघटनेच्या अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालून प्रशासनाची उदासिनता उघड केली आहे.

ठाणे : जिल्ह्यातील बहुतांशी गांवपाड्यांमधील गर्भवती आणि स्तनदामातांसह ० ते ६ वयोगटांतील बालकांना गरम ताजा आहार, अंडी, केळी यांचे नियमित वाटप होत नसतांनाही सर्व काही सुरळीत असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून सतत भासवले जात आहे. प्रशासनाच्या या निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळेच मुरबाड तालुक्यातील तब्बल चार आदिवासी गावपाडे या आहाराच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी श्रमिक मुक्ती संघटनेच्या अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालून प्रशासनाची उदासिनता उघड केली आहे.‘लोकमत’ने ‘पोषण आहार राम भरोसे’ या मथळ्याखाली ५ मे रोजी, तर ‘१,४३२ कुपोषित बालकांचा जीव मुठीत’ या मथळ्याखाली २३ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करून जिल्ह्यातील या पोषण आहार वाटपाच्या दुर्लक्षितपणाकडे जिल्हा परिषदेचे लक्ष वेधले आहे. परंतु, ठरविक गांव, त्यातील परिवार आदी माहिती विचारून आपल्या गलथानपणावर पांघरून घालणाºया या प्रशासनाच्या नाकर्तेपणा व निष्काळजीमुळे मुरबाड तालुक्यातील या चार गावांची मिळून एक हजार १८४ आदिवासी लोकसंख्या या अमृत आहारासकट अनेक योजनांपासून वंचित राहिल्याचे वाभाडे श्रमिक मुक्तीने आता काढले आहेत. पोषण आहार योजनांचे लाभार्थी माता, महिला, कुमारीका, कुपोषित बालके आदींची आकडेवारी गुलदस्त्यात ठेऊन जिल्ह्यातील काम अगदी सुरळीत सुरू असल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून भासवले जात आहे. सीईओ यांनी आदेश देऊनही आकडेवारी दडवून ठेवणाºया या प्रशासनाकडील नोंदीपेक्षा जास्त कुपोषित बालके, गर्भवती माता, स्तनदा माता व विद्यार्थिंनी जिल्ह्यात असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस केलेले आहे.कुपोषण कमी करण्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना २०१५ पासून सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक आदिवासी गावपाड्यांत या योजनेचा लाभ अजूनही पोहोचलेला नाही. तर, काही ठिकाणी वाटपात सातत्य नाही. त्यामुळे गर्भवती, स्तनदा मातांना ताजा गरम आहार मिळत नसल्याचे तुळपुळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.पाच वर्षे पोषण आहारच नाहीया आहारापासून वंचित वाड्यांमध्ये वाघवाडी, ढोबेवाडी, कोळेवाडी व काठेवाडी या चार आदिवासी वाड्या मिळून तयार झालेल्या या सिंगापूर या गावाचा समावेश आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सिंगापूर ग्रामपंचायतीतील १०० टक्के आदिवासी लोकसंख्येच्या चार वाड्यांतील पात्र लाभार्थी या आहारापासून गेली पाच वर्षे वंचित आहेत. पळू या महसुली गावाचे १५ ते २० वर्षांपूर्वी विभाजन होऊन त्यातील या चार गावांचे सिंगापूर हे स्वतंत्र गाव घोषित केलेले आहे.

टॅग्स :thaneठाणे