शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

लॉजमधील १२ बेकायदा खोल्या पाडल्या

By admin | Updated: May 1, 2017 06:07 IST

खारीगाव नाका येथील भाजी मार्केटमधील मानसरोवर या इमारतीत बेकायदा व्यवसाय सुरू असलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील

भार्इंदर : खारीगाव नाका येथील भाजी मार्केटमधील मानसरोवर या इमारतीत बेकायदा व्यवसाय सुरू असलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील १२ बेकायदा खोल्या तब्बल २० वर्षानंतर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी जमीनदोस्त केल्या. रविवारी सुद्धा मानसरोवरील कारवाई सुरुच ठेवण्यात आली होेती.काही दिवसांपूर्वी राज्य विधीमंडळ महिला हक्क समितीने पालिकेला भेट देत शहरातील तसेच पालिका कार्यालयातील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी नगरसेवक प्रेमनाथ पाटील व नगरसेविका कल्पना म्हात्रे यांनी भार्इंदर पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात वारांगनांचा वावर असून त्याचा त्रास सामान्यांना होतो. त्याविरोधात अनेक तक्रारी देऊनही पोलीस कारवाई करीत नसल्याची बाब समितीच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच वारांगनांमुळे परिसरात बेकायदा लॉजिंग-बोर्डींगची संख्या वाढत असताना पालिकाही कारवाई करीत नसल्याची तक्रार केली होती. त्यावेळी समितीने पालिकेला बेकायदा लॉजिंग-बोर्डींगवर कारवाई करण्यासह विभागीय पोलीस अधिकारी नरसिंग भोसले यांना वारांगनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पालिकेने शनिवारी प्रभाग समिती कार्यालय तीन अंतर्गत असलेल्या खारीगाव नाकाजवळच्या भाजी मार्केट परिसरातील मानसरोवर लॉजवर प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांच्या नियंत्रणाखाली पथकाने कारवाई केली. या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर दुकाने तर पहिल्या मजल्यावर गोदाम सुरु होते. दुसऱ्या मजल्यावर पाच व तिसऱ्या मजल्यावर सात खोल्यांसह गच्चीवर पत्र्याची शेड बांधून त्यात अनैतिक व्यवसाय सुरु करण्यात येत होता. (प्रतिनिधी)केवळ कागदीघोडे नाचविलेहा प्रकार २० वर्षापासून पालिकेने केवळ लॉजिंग-बोर्डींगचे मालक रतन व्यास यांना नोटीस बजावण्याची कागदी कारवाई केली होती. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. अखेर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त दीपक पुजारी यांना कारवाईचे आदेश दिले.