शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्ली उड्डाणपुलावर बसवले १२ गर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ठाकुर्ली उड्डाणपुलाचे कल्याण दिशेकडील काम कुर्मगतीने सुरू असल्याबद्दल नेहमीच ओरड होते. मात्र, सध्या या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ठाकुर्ली उड्डाणपुलाचे कल्याण दिशेकडील काम कुर्मगतीने सुरू असल्याबद्दल नेहमीच ओरड होते. मात्र, सध्या या पुलाच्या कामाला वेग आला आहे. मागील आठवडाभरात या पुलावर १२ गर्डर बसवण्यात आले आहेत. येत्या काळात तेथे मास्केट आणि प्लास्टर करण्यात येणार आहे.

डोंबिवली पूर्व - पश्चिमेस ये - जा करण्यासाठी सध्या ठाकुर्ली उड्डाण पुलाचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. सध्या या पुलाची डोंबिवली दिशेकडील बाजू सुरू आहे. कल्याण दिशेकडील बाजूचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पुलाच्या परिसरातील सोसायट्यांमधील रहिवासी व दुकानदारांना धूळ, चिखल तसेच सतत कामाच्या आ‌वाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व मुले कमालीची त्रस्त झाली आहेत.

या पुलाचे काम अर्धवट असल्याबद्दल आमदार रवींद्र चव्हाण यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी कामाच्या संथ गतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कामाला गती देत आठवडाभर रात्रीच्या वेळेत पुलावर गर्डर टाकण्यात आले होते. या पुुलाचे आणखी आठ गर्डर मे महिन्याच्या अखेरपर्यंत टाकून तेथे प्लास्टर करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पुलाचे पिलर उभारण्यासह अन्य कामात तांत्रिक अडचणी येत असल्याने कामात दिरंगाई होत असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.

दरम्यान, सध्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी गर्डर उभारण्यात येत आहे. त्या पुढे रेल्वेच्या हद्दीतही कामाला वेग देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

----------------