शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

११८ कोटींचा अर्थसंकल्प : परिवहनची मदार केडीएमसीच्या अनुदानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:26 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा ११८ कोटी १२ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांना सादर केला.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा ११८ कोटी १२ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांना सादर केला. त्यात दोन कोटी ६७ लाख रुपयांची शिल्लक नमूद केली आहे. या अर्थसंकल्पाची सगळी मदार परिवहन उपक्रमाची पालक संस्था असलेल्या महापालिकेच्या अनुदानावर असल्याचा उल्लेख पावशे यांनी केला आहे.२०१७-१८ च्या सुधारित अर्थसंकल्पात ८५ कोटी ४९ लाख रुपये जमा तर ८२ कोटी ९९ लाख रुपये खर्च दाखवला आहे. त्यात शिल्लक रक्कम अडीच कोटींची असल्याचे नमूद केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ३३ कोटी रुपये जास्तीचे उत्पन्न अपेक्षित धरल्याने जमेची रक्कम ११८ कोटींच्या घरात अपेक्षित आहे. उत्पन्नाची बाजू १८८ कोटी १२ लाख असली तरी खर्च ११५ कोटी १५ लाख रुपये अपेक्षित आहे.परिवहन उपक्रमाला १९ वर्षे झाली. मात्र, आजपर्यंत हा उपक्रम कधीही फायद्यात नव्हता, असे सभापतींनी कबूल केले आहे. महापालिकेकडून उपक्रमास भरघोस अनुदान मिळते. यापुढेही मिळावे, अशी आपेक्षा सभापतींनी व्यक्त केली आहे. ११८ बस पैकी उपक्रमाच्या ८० ते ९० बसे रस्त्यावर धावतात. उपक्रमात ५३१ कर्मचारी आहेत. आउट सोर्सिंगद्वारे ३० ते ३५ चालक वाहक घेतले आहेत. ३३ मार्गांवर धावणाºया बसमधून ४५ ते ५० हजार प्रवासी प्रवास करतात.मागच्या वर्षी १४६ कोटीचे अंदाज पत्रक तयार करण्यात आले होते. त्यात सुधारणा करून अर्थसंकल्प ८५ कोटींवर आणला. आता पुन्हा यंदाच्या अर्थसंकल्प हा ८५ कोटीवरून ११८ कोटींवर नेला आहे. ३३ कोटी वाढ केली आहे. महापालिकेतील आर्थिक कोंडी विचारात घेऊन परिवहनचा अर्थसंकल्प मागील वर्षीच्या तुलनेत २८ कोटींनी कमी आहे. भांडवली व महसुली खर्च धरून परिवहन उपक्रमाला यंदाच्या वर्षी ५४ कोटी ९७ लाख रुपये अनुदानाची गरज आहे. त्यामुळे त्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. महापालिकेने जानेवारी २०१८ अखेर परिवहन उपक्रमास १३ कोटी ७५ लाख रुपये अनुदान दिले आहे. जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुर्त्थान अभियानांतर्गत नवीन बस खरेदीसाठी २९ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान महापालिकेकडून तर सरकारकडून आठ कोटी ७३ लाखाचे अनुदान मिळणे अपेक्षित आहे. पोलीस ग्रॅण्डपोटी २ कोटी ८२ लाख, आमदार व खासदार फंडातून ५० लाख रुपये, जाहिरातीपोटी २२ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. २१८ बस यंदाच्या वर्षी रस्त्यावर आल्यानंतर त्यांच्या प्रवासी उत्पन्नातून ४४ कोटी ३३ लाख रुपये उत्पन्न मिळू शकते.पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या फरका पोटी परिवहन कर्मचाºयांना ३२ कोटी ६६ लाख रुपयांची देणे आहे. त्यासाठी सरत्या वर्षाकरता दोन कोटींची व यंदाच्या वर्षाकरता १० कोटींची तरतूद आहे.परिवहन मजदूर युनियनचा ‘चक्का जाम’चा इशारापरिवहन उपक्रमातील कामगारांचा जानेवारीचा पगार अद्याप झालेला नाही. तसेच फेब्रुवारी महिना उद्या संपत आहे. कर्मचाºयांच्या मागील फरकाची रक्कम मिळालेली नाही. पगार व फरकाची रक्कम ४ मार्चपूर्वी न मिळाल्यास परिवहन कर्मचारी ५ मार्चपासून बेमुदत चक्का जाम आंदोलन करतील, असा इशारा परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.नवीन तरतुदीत काय?परिवहन टर्मिनल विकास, परिवहन भवन, कार्यशाळा अत्याधुनिकरण, बस वॉशिंग मशीन, टायर चेंजर, व्हील अलायन्मेंट मशीन, नायट्रोजन गॅस फिलींग मशीन, एअर कॉम्प्रेसर, बस दुरुस्ती यंत्रणा, आगार व कार्यशाळेस पायाभूत सुविधा पुरविणे, चालक, वाहक व तांत्रिक कामगारांची भरती करणे, रेल्वे स्थानकाच्या परिसरात स्वतंत्र बस टर्मिनलची उभारणी, प्रवासी व विद्यार्थी स्मार्ट प्रवास कार्ड, ईटीआयएम व व्हीटीएमएस मशीन, एम इंडिकेटर, मोबाइल अ‍ॅप्सद्वारे बसचे वेळापत्रक आदी सेवा देण्याचा मानस पावशे यांनी व्यक्त केला आहे. कर्मचारी प्रशिक्षण, विमा, आरोग्य तपासणी सोयी सुविधा देणे, प्रवासी भाड्याचे सूसुत्रीकरण करणे, मध्यवर्ती वाहतूक नियंत्रण कक्ष उभारायचे ठरविले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका