शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘एसआरए’साठी ११४ घरे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:16 IST

ठाणे : येथील पोखरण रोड नं. २ वरील सुभाषनगर परिसरातील एसआरएच्या जागेवरील सुमारे ११४ पेक्षा अधिक घरे शुक्रवारी जमीनदोस्त ...

ठाणे : येथील पोखरण रोड नं. २ वरील सुभाषनगर परिसरातील एसआरएच्या जागेवरील सुमारे ११४ पेक्षा अधिक घरे शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आली. पात्र रहिवाशांना एसआरएची घरे बांधून देण्यासाठी ही कारवाई केली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईला रहिवाशांनी विरोध न करता प्रतिसाद दिल्यामुळे कारवाई यशस्वी झाल्याचे येथील एसआरएच्या उपजिल्हाधिकारी दीप्ती सूर्यवंशी यांनी लोकमतला सांगितले.या कारवाईआधी रहिवाशांची अन्यत्र निवासव्यवस्था करण्यात आली असून काही रहिवासी ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये, तर काहींनी भाड्याची घरे घेऊन निवासव्यवस्था केली आहे. यासाठी संबंधित विकासकाने रहिवाशांना घराचे भाडे देऊन अन्यत्र व्यवस्था केली आहे. इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत विकासकाला घरभाडे द्यावे लागेल. त्यात दरवर्षी १० टक्के वाढ करण्याचीही तरतूद आहे. मात्र, रहिवाशांना याची खात्री पटत नव्हती. त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे बहुतांशी लोकांनी घरे खाली केली नव्हती. त्यांच्यातील मतभेद व विकासकाशी जुळवून न घेण्याचा वादही होता. पण, आता त्यांना खात्री पटवून दिली आहे. यामुळे ११४ रहिवाशांना नोटीस बजावून घरे तोडण्यात आली. त्यांनी आधीच आपले साहित्य अन्यत्र हलवले असल्यामुळे कारवाईला विरोध झालेला नसून शांततेत व निर्विघ्न कारवाई करता आल्याचे त्यांनी सांगितले.