शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात वर्षभरात १११ इम्पोर्टेड गाड्या; शासकीय तिजोरीत १२७० कोटींचा कर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:36 IST

सर्वसामान्य माणूस स्वप्नातच गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पाहतो. दुसरीकडे अशी काही माणसे आहेत, जी लाखो नाही तर करोडो रुपयांच्या गाड्या खरेदी करतात. अशाप्रकारे, ठाण्यात गेल्या वर्षात तब्बल १११ इम्पोर्टेड गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे.

ठाणे : सर्वसामान्य माणूस स्वप्नातच गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पाहतो. दुसरीकडे अशी काही माणसे आहेत, जी लाखो नाही तर करोडो रुपयांच्या गाड्या खरेदी करतात. अशाप्रकारे, ठाण्यात गेल्या वर्षात तब्बल १११ इम्पोर्टेड गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. या गाड्या आयात झाल्यावर गाडीमालकांकडून आयात करापोटी ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाने तब्बल १२७० कोटींचा निधी वसूल केला आहे. अशा प्रकारे आलिशान गाड्यांमुळे ठाणे शहराची ओळखही हळूहळू बदलत असल्याचे दिसते. यामध्ये चारचाकी गाड्याच नाहीतर दुचाकींची संख्याही जवळपास समसमान असल्याची माहिती सूत्रांनी दिली.एकीकडे ठाणे स्मार्ट होत असताना त्याच इम्पोर्टेड दुचाकी आणि चारचाकी गाड्या खरेदी करून ठाणेकर नागरिकही स्मार्ट होत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल १११ इम्पोर्टेड गाड्या ठाणेकरांनी खरेदी केल्या आहेत. त्यामध्ये ५३ दुचाकी आणि ५८ चारचाकींचा समावेश आहे. तसेच खरेदी केलेल्या गाड्यांमध्ये मर्सिडिझ बेन्झ, बेन्टली, बीएमडब्ल्यू, पोर्श, रेंज रोव्हर, आॅडी, फेरारी, मेबॅक ते अगदी रोल्स रॉइसपर्यंतच्या महाग गाड्या ठाण्यात दिसत आहेत. त्यातील सर्वात महाग गाडीची किंमत साडेचार कोटींच्या घरात असल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली आहे.रोल्स रॉइसचे घोस्ट हे चार कोटी दोन लाखांचे मॉडेल आणि त्याचबरोबर बेन्टली ही ४ कोटींची गाडी ठाण्यात पाहण्यास मिळत आहे. तसेच १ ते २ कोटींच्या १३ गाड्या असून ८० लाखांच्या २७ गाड्या आहेत.५० लाखांच्या १२ गाड्या५० लाखांपर्यंतच्या १२, ४० लाखांपर्यंतच्या १९ आणि १० लाखांहून अधिक किमतीच्या २२ अशा १११ इम्पोर्टेड गाड्या ठाणेकरांनी खरेदी केल्या. त्यांच्या आयात शुल्कापोटी १,२७० कोटींचा निधी वसूल केल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे