शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून ११ वर्षांच्या मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 06:00 IST

११ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून गळा चिरून खून केल्याची घटना रविवारी उल्हासनगरात घडली.

उल्हासनगर : ११ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून गळा चिरून खून केल्याची घटना रविवारी उल्हासनगरात घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मानेरेगावात गणेश आल्हाट कुटूंबासह राहतो. कॅम्प नं-५ येथील जीन्स कारखान्यात तो पत्नीसह कामाला आहे. त्यांचा ११ वर्षाचा मुलगा हर्ष शाळा सुटल्यावर जीन्स कारखान्यात येत असे. रविवारी तेथे आलेला हर्ष सायंकाळी घरी जाताना अचानक गायब झाला. मुलगा घरी गेला असेल, अशी समजूत काढून गणेश पत्नीसह घरी गेला. मात्र मुलगा घरी दिसला नाही. मुलाची शोधाशोध सुरू केली असता मुलगा जयजनता कॉलनीतील एका खोलीत रक्ताच्या थारोळयात सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.जाकीर अन्सारी यांच्या भाडयाच्या खोलीत हर्षचा मृतदेह होता. शेजारीच चाकू होता. अन्सारी यांच्यासोबत १२ ते १५ तरूण भाडयाने राहत असल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. के. खंदारे यांना मिळाली. त्यांनी अधिक चौकशी केली असता, सर्वच मुले गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आली. मुलाचे अपहरण करून खून केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.