शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

१०० एमएलडी पाणीयोजना एक हजार झाडांमुळे रखडली

By admin | Updated: March 21, 2016 01:05 IST

वसई विरार महानगरपालिका हद्दीतील पाणी टंचाईवर मात करणाऱ्या सूर्या टप्पा ३ च्या योजनेची पाईपलाईन टाकण्यात १ हजार १०१ झाडांचा अडथळा आला आहे.

शशी करपे, वसईवसई विरार महानगरपालिका हद्दीतील पाणी टंचाईवर मात करणाऱ्या सूर्या टप्पा ३ च्या योजनेची पाईपलाईन टाकण्यात १ हजार १०१ झाडांचा अडथळा आला आहे. हरित न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर वृक्ष तोडून पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. हरित न्यायालयाची संमती मिळाल्यानंतर योजना पूर्ण होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापर्यंत वसईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. वसई विरारच्या लोकसंख्येला सध्या २२२ एमएलडी पाण्याची गरज आहे. सध्या पेल्हारचे १०, उसगावचे २० आणि सूर्याचे १०० मिळून १३० पाणी पुरवठा होत आहे. ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी पालिकेने सूर्या टप्पा क्रमांक ३ ची योजना हाती घेतली. यातून पालिकेला दररोज १०० एमएलडी पाणी पुरवठा होणार आहे. ही योजना २७८ कोटी रुपयांची असून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत ५० टक्के अनुदान मिळाले आहे. त्यामुळे पालिकेला १३५ कोटी रुपये भरावयाचे आहेत. सप्टेंबर २०१२ च्या महासभेत या योजनेच्या ३५० कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारने २७जानेवारी २०१४ रोजी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत ५० टक्के निधी देण्यास मान्यता दिली. पैशाच्या प्रश्न निकाली निघाल्यानंतर जलवाहिन्या वनखात्याच्या जागेतून जाणार असल्याने त्यासाठी वनखात्याची परवानगी मिळाल्यानंतर कामाला गती आली आहे. मात्र, आता १० किलोमीटर अंतरात १ हजार १०१ झाडांनी अडथळा आणल्याने योजनेचे काम रखडून पडले आहे.त्याआधी ५८ किलोमीटर पैकी वनखात्याच्या २८ किलोमीटर जागेतून जलवाहिन्या टाकायच्या होत्या. बऱ्याच पाठपुराव्यानंतर वनखात्याने परवानगी दिली आणि डिसेंबरमध्ये जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यासाठी जागेचा मोबदला म्हणून महाड येथे १७ एकर जागा वनखात्याला द्यावी लागली. वनखात्याचा अडसर दूर झाल्यानंतर कामाने वेग घेतला असताना आता १ हजार १०१ झाडांचा अडसर आल्याने योजनेच्या पुढच्या कामाला खिळ बसली आहे. वृक्ष तोडण्यासाठी हरित न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर तीन महिन्यात योजनेचे काम पूर्ण होईल, असे पालिकेचे म्हणणे आहे. मार्च महिना अखेर सुुरु असून अद्यापपर्यंत परवानगी न मिळाल्याने पावसाळ्यानंतरच प्रत्यक्षात पाणी मिळेल हे स्पष्ट झाले आहे.