शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

४०० कर्मचाऱ्यांचे काम करतायेत १०० कर्मचारी; एसटी कर्मचाऱ्यांनी दयनीय अवस्था

By अजित मांडके | Updated: March 6, 2024 14:43 IST

एसटीच्या कळवा विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

ठाणे : एसटी महामंडळाच्या कळवा येथील विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी हे आता विविध समस्यांनी ग्रासले असून या समस्यांना वाचा फोडण्यासाठी येथील कर्मचाºयांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. ४०० कर्मचाºयांचे काम हे १०० कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. आरटीओ पासींग गाड्यांची कामे तीन दिवसाऐवजी एका दिवसात करुन घेतली जात असल्याचेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. एकूणच यातून मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.कळवा येथील विभागीय कार्यशाळेचे बांधकाम हे २० वर्षे जून असून पूर्वी याठिकाणी ४०० च्या आसपास कर्मचारी कार्यरत होते. परंतु २०१७ नंतर नवीन कर्मचाऱ्यांचीच भरतीच न झाल्याने ४०० कर्मचाऱ्यांचे काम १०० कर्मचाºयांना करावे लागत आहे. या ठिकाणी आरटीओ पासीगंच्या गाडयांची कामे तसेच ८ डेपोच्या गाडयांच्या रिपेअरिंगचे कामे, बॉडीची कामे, पेंटींगची कामे, तसेच इंजिन गेअरबॉक्स, क्लचप्लेट, क्रशर प्लेट, पिनीअन, जॉईंटस रेडीएटर, पाटे, वेल्डींग, अपोहस्टर खाते, इलेक्ट्रीशिअनची कामे, फ्रंट अ‍ॅक्सल ही सर्व रिपेअरिंगचे कामे जवळपास ७०० गाडयांची कामे केली जातात ही कामे करत असतांना कर्मचा-यांना अनेक समस्या भेडसावत आहेत.

आरटीओ पासिंग गाडयांची कामे ३ दिवसाचे काम एका दिवसामध्ये सक्तीने करुन घेतले जाते. नाही केल्यास प्रशासकीय दबाव टाकला जातो. म्हणजेच बदली करून चार्जशिट घेऊन पंचिंग कार्ड जमा करुन अर्धा दिवसाचा पगार कापुन अशा धमक्या देऊन कर्मचा-यांची मानसिक खराब केली जाते. हेवी वर्क असल्याने ५० टक्के कर्मचारी हे शारिरीक व्याधीनी त्रस्त आहेत. व काही कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. संपुर्ण वर्कशॉपचे बांधकाम पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ९० ते १०० कर्मचा-यांचा जिव धोक्यात आहे. टॉयलेट, बाथरुम अस्वच्छ व पडक्या स्थितीत आहे व तसेच वर्कशॉपच्या आवारामध्ये साफसफाई केली जात नाही, अपघात झाल्यास प्रथमोपचार पेटी व रुग्णवाहिकेची सोय नाही. अत्याधुनिक यंत्र सामुग्री तसेच हायड्रॉलिक जाक उपलबध नाहीत.

कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कामे म्हणजेच मासिक वेतन वाढ ही ६ महिने ते १ वर्ष उशिराने मिळते. तसेच मेडिकल बिलांचे क्लेम व टी.ए. बिल वेळेत मिळत नाही. कर्मचा-यांना लिव्ह बॅलेंस बद्दल माहिती लवकर मिळत नाही, कर्मचा-यांसाठी कँटिनची व्यवस्था नाही, पाण्याच्या टाक्या वेळेवर साफ होत नसल्यामुळे कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी संबधीत यंत्रणेकडे पाठपुरावा केला जाईल आणि कर्मचाºयांना न्याय दिला जाईल अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.