शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींचा दंड कायम

By admin | Updated: April 23, 2016 01:59 IST

डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक पट्ट्यातील रासायनिक कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने डोंबिवली, अंबरनाथ औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र

कल्याण : डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक पट्ट्यातील रासायनिक कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने डोंबिवली, अंबरनाथ औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिका आणि बदलापूर व अंबरनाथ पालिकेसह औद्योगिक विकास महामंडळास ठोठावलेला १०० कोटींचा दंड सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. लवादाच्या या दंडाविरोधात डोंबिवली सांडपाणी प्रक्रिया केंद्राने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने लवादाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यामुळे ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने संबंधितांना १०० कोटींचा दंड भरावाच लागणार आहे. यामुळे प्रदूषणाच्या विरोधातील ‘वनशक्ती’च्या लढ्यास यश मिळाले. कारखान्यांतून बाहेर सोडल्या जाणाऱ्या रसायनमिश्रित सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे ते सांडपाणी थेट कल्याण खाडी, उल्हास नदी, वालधुनी नदीत सोडले जाते. याविरोधात ‘वनशक्ती’ने लढा सुरू केला. हरित लवादाकडे त्यांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये याचिका दाखल केली. लवादाने वारंवार आदेश देऊनही स्थानिक स्वराज्य संस्था व सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्यांच्या कामात सुधारणा दिसून येत नसल्याने लवादाने १०० कोटींचा दंड ठोठावला होता.