शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्या पूर्वी ओवळा माजिवडा मतदारसंघातले १०० बस थांबे व विश्रांती कट्टे होणार सुशोभित; १० कोटींचा खर्च

By धीरज परब | Updated: May 10, 2023 17:19 IST

मीरा भाईंदर व ठाणे शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासह नागरिकांना देखील आवडतील असेल हे बस थांबे व विश्रांती कट्टे बनवले जाणार आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदर व ठाण्याच्या काही भागात आलेल्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात १०० बस स्टॉप व ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती कट्टे आकर्षक स्वरूपात उभारण्याचे काम पावसाळ्या पूर्वी पूर्ण केले जाणार असून त्यासाठी १० कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. 

मीरा भाईंदर व ठाणे शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासह नागरिकांना देखील आवडतील असेल हे बस थांबे व विश्रांती कट्टे बनवले जाणार आहेत. लोकांचे लक्ष वेधून घेतील असे रंगबेरंगी तसेच बसरिक्षामेट्रो, रेडिओरेल्वे, संत्र - सफरचंद अशा फळांच्या आकर्षक प्रतिकृतीमध्ये हे बस स्टॉप व विश्रांती कट्टे तयार करण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत. शहरात पहिल्यांदाच अश्या आकारां मध्ये हे बस स्टॉपविश्रांती कट्टे होणार असल्याने परिसराची देखील शोभा वाढणार आहे. त्यासाठी जागांची निश्चिती महापालिकेने केली असून पुढील आठवड्यात कामाची सुरुवात होऊन पावसाच्या आधी जून महिन्यात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल असे आ. सरनाईक यांनी सांगितले. 

बस पकडण्यासाठी ऊन - पावसात उभे राहणारे नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती घेण्यासाठी विश्रांती कट्टे चांगले आकर्षक असावेत. नागरिकांना प्रसन्न वाटावे यासाठी बस स्टॉप व विश्रांती कट्टे तयार करण्याची संकल्पना मांडली होती. मान्यवर डिजाईनरकडून ह्या अनोख्या  बस स्टॉप व विश्रांती कट्ट्यांचे डिजाईन बनवून घेतले.  बस स्टॉपवर जाहिरात करण्याचा अधिकार देऊन त्यांच्याकडून त्याची देखभाल - दुरुस्तीची जबाबदारी १० वर्षासाठी ठेकेदाराला देण्यात येईल. त्या बदल्यात बस स्टॉप व  विश्रांती कट्ट्यावर ३ फूट जागेत जाहिरात करण्याचा अधिकार त्या संस्थेला देण्यात येणार असल्याचे या. सरनाईक म्हणाले. 

टॅग्स :mira roadमीरा रोड