शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरवासीयांच्या सेवेत १०० खाटांचे नवे सुसज्ज रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 20:30 IST

उल्हासनगर येथील धोकादायक झालेल्या कामगार रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले असून सध्याच्या इमारती पाडून त्या ठिकाणी १०० खाटांचे नवे रुग्णालय उभारणीचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला सुपूर्द करण्यात आले आहे.

ठाणे : उल्हासनगर येथील धोकादायक झालेल्या कामगार रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले असून सध्याच्या इमारती पाडून त्या ठिकाणी १०० खाटांचे नवे रुग्णालय उभारणीचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला सुपूर्द करण्यात आले आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असून त्याबाबतचे पत्र कामगार राज्य विमा योजना महामंडळाच्या दिल्लीतील मुख्यालयातून खा. डॉ. शिंदे यांना प्राप्त झाले आहे. उल्हासनगरवासीयांना सुसज्ज अत्याधुनिक रुग्णालय मिळवून देण्याचा शब्द खा. डॉ. शिंदे यांनी अलिकडेच जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत दिला होता.आयआयटीने केलेल्या सर्वेक्षणात उल्हासनगर येथील कामगार रुग्णालयाच्या सर्वच्या सर्व १३ इमारती धोकादायक झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे या रुग्णालयाचा पुनर्विकास व्हावा आणि नवे सुसज्ज रुग्णालय तयार करण्यात यावे, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात त्यांनी या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित केला, तसेच केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि कामगार राज्य विमा योजनेचे मुख्य अभियंते सुदीप दत्ता यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तातडीने रुग्णालयाच्या पुनर्विकासाची मागणी केली होती.त्यानंतर राज्याचे आऱोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचीही मुंबई येथे मंत्रालयात वारंवार भेट घेऊन या रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा केला होता. खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे डॉ. दीपक सावंत यांनी गेल्या वर्षी ६ सप्टेंबर रोजी कामगार रुग्णालयाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहाणी केली होती. या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव लवकरच केंद्राकडे पाठवण्याची ग्वाही डॉ. सावंत यांनी या भेटीनंतर दिली होती.

टॅग्स :thaneठाणे