शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

स्वाइनने घेतला १० वर्षीय आर्यनचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:02 IST

ठाणे शहरातील १० वर्षांच्या आर्यन मेढेकर याचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने आतापर्यंत शहरातील मृतांची संख्या १५ तर जिल्ह्यातील मृतांची संख्या २९ झाली आहे. ही साथ ठाण्यासारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात अधिक पसरु नये याकरिता आवश्यक असलेली प्रतिबंधात्मक लस अद्यापही उपलब्ध नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे

ठाणे : ठाणे शहरातील १० वर्षांच्या आर्यन मेढेकर याचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने आतापर्यंत शहरातील मृतांची संख्या १५ तर जिल्ह्यातील मृतांची संख्या २९ झाली आहे. ही साथ ठाण्यासारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात अधिक पसरु नये याकरिता आवश्यक असलेली प्रतिबंधात्मक लस अद्यापही उपलब्ध नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. खाजगी रुग्णालयात मात्र ही लस उपलब्ध असून केवळ शासनाच्या अनास्थेमुळेच शासकीय रुग्णालयांत स्वाइनची लस उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे.ठाण्यातील खोपट परिसरात राहणारा आर्यन याला स्वाइची लागण झाली होती. त्यामुळे त्याला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु सोमवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान या घटनेनंतर स्थानिक भाजपाचे स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांनी स्थानिक रहिवाशांसह मंगळवारी दुपारी महापालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आर. टी. केंद्रे यांना त्यांच्या दालनात जाऊन घेराव घातला. स्वाइनचा आकडा वाढत असतांना प्रशासनाकडून कशा पध्दतीने जनजागृती केली जाते असा जाबही त्यांनी विचारला. प्रशासनाकडून जनजागृती सुरू आहे. तसेच इतर उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती केंद्रे यांनी दिली.दरम्यान, या स्वाइन फ्ल्युसाठी आवश्यक असलेली प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे, का? असा सवाल पवार यांनी केला असता, त्यासंदर्भात वारंवार संबधींत कंपनीशी फोनवरुन चर्चा सुरु असल्याचे केंद्रे यांनी स्पष्ट केले.आरोग्य विभागाने २५ हजार लसी मागवल्या आहेत. परंतु कित्येक दिवसापासून मागणी करुनही त्या उपलब्ध झालेल्या नाहीत. खाजगी रुग्णालयात ही लस ८१० रुपयांना उपलब्ध असून, शासकीय रुग्णालात ही लस ३५८ रुपयांना दिली जाते. दरातील या तफावतीमुळे खासगी रुग्णालयांचे उखळ पांढरे करण्याकरिता लस तयार करणारी कंपनी व खासगी रुग्णालये यांनी शासकीय रुग्णालयांपर्यंत लस पोहोचणार नाही, अशी व्यवस्था केल्याची चर्चा आहे. स्वाइनचा वाढता धोका लक्षात घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबत एक आढावा बैठकही लावली होती. त्यानंतर लस उपलब्ध करुन घेण्याबाबत त्यांनी संबधींत यंत्रणेला आदेश दिले होते. परंतु आजही या लसींचा तुटवडा असल्याचेच दिसून आले आहे.१ जानेवारी ते २५ जुलैपर्यंत १ लाख ३७ हजार ४६९ रु ग्णांनी फ्लू संदर्भात तपासणी केली आहे. यामध्ये ६०५ जणांना स्वाइनची लागण झाली असून, ४१२ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर अजूनही १६८ रुग्ण उपचारार्थ विविध रुग्णालयात दाखल आहेत. त्यात आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात २९ जणांचा स्वाइनने मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ठाण्यात १५ रु ग्ण दगावले आहे. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत ५, मीरा-भार्इंदर ४ आणि नवीमुंबई महापालिका हद्दीत दोघांचा मृत्यू झाला आहे.