शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात १० हजार ६६३ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया

By अजित मांडके | Updated: March 22, 2024 17:06 IST

मोतीबिंदूच्या बाबतीत अनेकजण दुर्लक्ष करताना दिसतात. काहींना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही तर काही व्यक्ती आज करू उद्या करू म्हणून टाळाटाळ करतात. मात्र याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता अधिक असते.

ठाणे : डोळ्यांतील मोतीबिंदूकडे दुर्लक्ष केल्यावर अंधत्वचा येण्याचा धोका लक्षात घेता,  राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियानात  विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया पंधरवडा मोहीम कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यात सिव्हील हॉस्पिटल, खाजगी रुग्णालय , वैद्यकीय महाविद्यालय आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून १० हजार ६६३ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्या असून, जिल्ह्याला दिलेल्या १० हजार लक्ष्या पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून राज्यात ठाणे जिल्ह्याचे कौतुक होत आहे.

 मोतीबिंदूच्या बाबतीत अनेकजण दुर्लक्ष करताना दिसतात. काहींना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही तर काही व्यक्ती आज करू उद्या करू म्हणून टाळाटाळ करतात. मात्र याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता अधिक असते. महाराष्ट्र मोतीबिंदू बॅकलॉग मुक्त करण्याच्या दृष्टीने सरकार कडून प्रयत्न केले जात आहेत. ठाणे जिल्ह्यात  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियानात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र पंधरवडा कार्यक्रम सरकारी खाजगी रुग्णालय आणि सेवा भावी संस्थांनी मिळून राबवला. यामध्ये १० हजार ६६३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा नेत्र शल्य चिकीत्सक डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी दिली.

राज्यात सर्वत्र १९ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबवले गेले. ठाणे जिल्ह्यात या अभियानात १० हजाराचे लक्ष दिले होते. परंतु लक्षा  पेक्षा अधिक शस्त्रक्रिया ठाणे जिल्ह्यात पार पडल्या आहेत. ठाणे सिव्हील रुग्णालयातील नेत्र विभागात मोतीबिंदू सोबत डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जात असतात. नेत्र चिकित्सा करण्यासाठी अद्यावत मशीन असून, खाजगी रुग्णालयात होणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असल्याचे नेत्र सर्जन डॉ. शुभांगी अंबाडेकर म्हणाल्या.

राज्यभरात ह्या मोहिमेत १ लक्ष्य मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्गिष्ट होते एक लाख ८ हजार ९३७ एवढ्या मोटोबिंदू शत्रक्रिया पार पडल्या. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या अभियानात ठाणे जिल्ह्यात  झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया कामगिरीचे शासन स्तरावर कौतुक होत आहे. डोळ्यांचा मोतीबिंदू  रोखायचा झाल्यास नियमित डोळ्यांची तपासणी करावी. धूम्रपान सोडणे, निरोगी आहार घेणे, अँटिऑक्सिडंट्स फळे आणि भाज्या खाव्यात, प्रखर उन्हात यूव्ही ब्लॉकिंग सनग्लासेस घालणे गरजेचे आहे.डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक,  ठाणे)

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर