शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे आणि भिवंडीत १० टक्के पाणी कपात

By अजित मांडके | Updated: November 1, 2022 15:34 IST

पिसे येथील न्युमॅटीक गेट सिस्टम मधील एअर ब्लॅडर बदलण्याच्या कामामुळे कपात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : मागील महिन्यात ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणा:या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवार पासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील १० दिवस मुंबई, ठाणे आणि भिवंडीला १० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

मागील वर्षी प्रमाणे यंदा देखील धरण क्षेत्रत मुबलक पाऊस झाला आहे. त्यामुळे ठाणेकरांची तुर्तास पाण्याची चिंता मिटली आहे. असे वाटत होते. परंतु ठाणेकरांना पावसाळ्यात आधीच दोन वेळा पाणी कपातीचा सामना करावा लागला होता. पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रच्या मुखाजवळ कचरा साठल्याने ठाणोकरांना पाणी कपातीला मुकावे लागले होते. त्यानंतर दिवाळीच्या आधी देखील याठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दोन ते तीन दिवस याचे काम करण्यात आले होते. परंतु पाऊस झाल्याने हे काम थांबविण्यात आले होते.  त्यानंतर आता पुन्हा पिसे येथील न्युमॅटीक गेट सिस्टम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले आहे. या कामाचा परिणाम १० दिवस जाणवणार आहे. त्यामुळे दिवाळी संपताच ठाण्यासह, मुंबई आणि भिवंडीला देखील १० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करु न ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरु न सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.दरम्यान या पाणी कपातीचा सामना पूर्ण ठाणो शहराला बसणार असल्याची माहिती पालिकेने दिली. मुंबई महापालिकेकडून कोपरीला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येथे फटका बसणार आहे. तसेच महापालिका पिसे धरणातून पाणी उचलत असल्याने त्याचा परिणाम घोडबंदर, वर्तकनगरसह संपूर्ण ठाणे शहराला बसणार आहे. एकूणच या कपातीचा कालावधीत पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असून ठाणेकरांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.