शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरअखेर ३८१ कोटी मालमत्ताकराची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:14 IST

मुंब्रा मागे; माजिवडा-मानपाडाची आघाडी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागाने ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ३८१ कोटी रु पयांची करवसुली केली आहे. यामध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधून सर्वाधिक म्हणजेच ११४ कोटी वसूल केले आहेत. तर, दुसरीकडे मुंब्रा आणि दिवा हे दरवर्षीप्रमाणे मागे पडले असून या दोन्ही प्रभाग समितींकडून डिसेंबरअखेर केवळ ३२ कोटींचीच वसुली झाली आहे. तर, मागील वर्षीच्या तुलनेत २०१९ डिसेंबरअखेरपर्यंत महापालिकेच्या करवसुलीत २० कोटींची वाढ झाली आहे.महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. महापालिकेने या आर्थिक वर्षात करनिर्धारण व वसुलीसाठी विविध योजना राबविल्या आहेत. २० करसंकलन केंद्राबरोबरच मोबाइल व्हॅनद्वारेदेखील नागरिकांना कर भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीमध्ये विविध उपाययोजना करूनही दरवर्षीप्रमाणे मागील वर्षीदेखील वसुलीत पालिकेला अपयश आले आहे. मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत केवळ १२ कोटी रु पयांची वसुली झाली. तर, दिव्यात २० कोटींची वसुली झाली. मागील वर्षी ३१ डिसेंबरअखेर ३६१ कोटी रुपयांची वसुली केली होती. यंदा मात्र त्यात २० कोटी रु पयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. डिसेंबरअखेर ३८१ कोटींची वसुली झाल्याची माहिती उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. त्यातही यावर्षी एकूण वसुलीत ३७ कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे.६५० कोटींचे उद्दिष्टमहापालिकेच्या कर विभागाला मार्चअखेरपर्यंत ६५० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. आता डिसेंबरअखेर ३८१ कोटींचे उद्दिष्ट गाठण्यात यश आले आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांत या विभागाला २६९ कोटींचे उद्दिष्ट गाठावे लागणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका