शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ९० ईव्हीएम-व्हीव्हीपॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:18 IST

१८ मतदारसंघ : प्रत्येकी पाच मशीन

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या कामकाजाचे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जय्यत तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी १८ विधानसभा मतदारसंघांच्या कार्यालयांना प्रत्येकी पाच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे. या मशीनद्वारे खास प्रशिक्षण अधिकारी, कर्मचाºयांना दिले जाणार आहे.ईव्हीएम वापरण्यासह व्हीव्हीपॅट मशीन मतदानकेंद्रावर कसे हाताळण्यात यावे, यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच आयोजित केले जाणार आहेत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचा पुरवठा आचारसंहिता लागू होताच करण्यात आला. या मशीन सरावासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यावर उत्तम सराव झाल्यानंतर मतदानकेंद्रांवर उद्भवणाºया समस्येवर संंबंधित अधिकारी व कर्मचाºयांना मात करणे शक्य होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कोपरी येथे असलेले गोडाउन आता तुर्भे येथे हलवण्यात आलेले आहे.तुर्भे येथील केंद्रीय धान्य महामंडळाच्या गोदामात जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आलेले आहेत. या गोदामांमधून आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा मतदारसंघांच्या कार्यालयांना केला जात आहे. मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य या गोदामांमधून कंटेनर व ट्रकद्वारे ठिकठिकाणी पोहोवले जाणार आहेत. त्या परिसरात वाहने उभी राहण्यासाठी व वळवण्यासाठीही मोठे मैदान असल्यामुळे तुर्भे येथे कोपरीतील साहित्य नेले आहे. यापुढे या गोदामांमधून साहित्य जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ व मतदानकेंद्रांवर पोहोच करण्याचे नियोजन केले आहे.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनVVPATव्हीव्हीपीएटी