शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

युकी एटीपी रँकिंगमध्ये १0१ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 02:45 IST

भारताचा अव्वल एकेरीतील खेळाडू युकी भांबरी याला ताज्या एटीपी एकेरी रँकिंगमध्ये ११ स्थानांचा फायदा झाला असून, तो १०१ स्थानावर पोहोचला आहे.

नवी दिल्ली : भारताचा अव्वल एकेरीतील खेळाडू युकी भांबरी याला ताज्या एटीपी एकेरी रँकिंगमध्ये ११ स्थानांचा फायदा झाला असून, तो १०१ स्थानावर पोहोचला आहे. युकीला चेन्नई ओपन चॅलेंजर स्पर्धेत केलेल्या सुरेख कामगिरीचा फायदा झाला. या स्पर्धेत तो उपविजेता ठरला होता.अंतिम फेरीत आॅस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनकडून पराभूत झाल्यानंतर त्याला या स्पर्धेतून ४८ रँकिंग गुण आणि ४२४० डॉलरची पुरस्कार रक्कम मिळाली.युकीनंतर एकेरी रँकिंगमध्ये रामकुमार रामनाथन (१४०), सुमित नागल (२१६) आणि प्रजनेश गुणेश्वरन (२४२) यांचा क्रमांक लागतो. युकीची कारकीर्दीतील सर्वोत्तम रँकिंग ८८ आहे जी की त्याने नोव्हेंबर २०१५ मध्ये मिळवली होती.पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना (२०) आणि दिविज शरण (४२) यांच्या रँकिंगमध्ये कोणताही बदल झाला नाही; परंतु लिएंडर पेसचे दोन स्थानांनी नुकसान झाले असून त्याची ४९ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यानंतर त्याचा जोडीदार पुरव राजा (५७) याचा क्रमांक लागतो. (वृत्तसंस्था)महिलांच्या एकेरीत अंकिता रैना अजूनही अव्वल भारतीय खेळाडू आहे. तिची रँकिंग २५५ वी आहे. तिला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. करमन कौर थांडी हिचे तीन क्रमांकांनी नुकसान झाले असून ती २८१ व्या स्थानावर आहे. महिला दुहेरीत दुखापतीमुळे कोर्टपासून दूर असणारी सानिया मिर्झा रँकिंगमध्ये १४ व्या स्थानावर कायम आहे.