शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

युवा टेनिसपटू युकीचा खळबळजनक विजय, जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावरील लुकासला दिला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 04:27 IST

भारताचा आघाडीचा एकेरी टेनिसपटू युकी भांबरी याने आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या लुकास पोउलो याला पराभवाचा धक्का दिला.

इंडियन वेल्स (यूएस) : भारताचा आघाडीचा एकेरी टेनिसपटू युकी भांबरी याने आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या लुकास पोउलो याला पराभवाचा धक्का दिला. युकीने या अनपेक्षित निकालासह इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत खळबळ माजवताना दिमाखात तिस-या फेरीत धडक मारली आहे.जागतिक क्रमवारीत ११०व्या स्थानी असलेल्या युकीने स्पर्धेत नववे मानांकन लाभलेल्या फ्रान्सच्या लुकासला सरळ दोन सेटमध्ये ६-४, ६-४ असे पराभूत केले. एक तास १४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या शानदार सामन्यात युकीने जबरदस्त खेळ करताना स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद केली. पात्रता फेरीतून स्पर्धेची मुख्य फेरी गाठलेल्या युकीच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय ठरला. याआधी युकीने आॅगस्ट २०१७ मध्ये सिटी ओपन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानी असलेल्या गोएल मोंफिल्स याला पराभूत करत खळबळ माजवली होती.पुढच्या फेरीत युकीपुढे अमेरिकेच्या सॅम क्वेरी याचे तगडे आव्हान असेल. क्वेरीने जर्मनीच्या मीशा झ्वेरेव याचा ६-४, ७-५ असा पराभव करत विजयी कूच केली आहे. पुरुष दुहेरी गटामध्ये भारताच्या रोहन बोपन्ना - एडुआर्ड रॉजर वेसलीन या जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. (वृत्तसंस्था)>जोकोचे आव्हान संपुष्टात...एकीकडे युकीने अनपेक्षित निकालाने सर्वांचे लक्ष वेधले असताना, जपानच्या तारो डॅनियलने दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात आणत सनसनाटी विजय मिळवला. तारोने जबरदस्त झुंज देताना तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पाचवेळचा चॅम्पियन जोकोविचचे तगडे आव्हान ७-६, ४-६, ६-१ असे परतावले. उजव्या हाताचा कोपरा दुखावल्याने विम्बल्डननंतर मागील सत्रात जोकोविच खेळला नव्हता. विशेष म्हणजे दुखापतीनंतर पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या जोकोची ही दुसरीच स्पर्धा होती.2014 साली चेन्नई ओपन स्पर्धेतहीयुकीने असाच अनपेक्षित विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानी असलेल्या फेबियो फोगनिनी याला पराभूत केले होते. मात्र, त्या वेळी फोगनिनी याने दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडला होता.45इंडियन वेल्समधील या धमाकेदार विजयामुळे युकीला आता४५ गुणांचा फायदा होणार असून ४७,१७० डॉलरचे पारितोषिकही मिळेल.मोठा विजयआतापर्यंत युकीने कोणतेही मोठे जेतेपद पटकावले नसले, तरी हा विजय त्याच्यासाठी एका जेतेपदापेक्षा कमी नाही.>जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दिग्गज रॉजर फेडररने दुसºया फेरीत विजय मिळवत आगेकूच केली. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात फेडररने फेडरिको डेलबोनिस याला ६-४, ७-६ असे नमविले.पावसामुळे सामना काही वेळ थांबविण्यात आला, त्या वेळी फेडरर दुसºया सेटमध्ये २-२ असा बरोबरीत होता. तब्बल १७व्यांदा या स्पर्धेत खेळत असलेल्या फेडररने उपांत्य फेरी गाठल्यास जागतिक क्रमवारीतील त्याचे अव्वल स्थान मजबूत होईल.