शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दिग्गज रॉजर फेडररची उपांत्य फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:27 IST

जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू आणि गतविजेत्या दिग्गज रॉजर फेडरर याने इंडियन वेल्स एटीपी स्पर्धेत दिमाखदार विजय मिळवताना उपांत्य फेरीत धडक मारली.

इंडियन वेल्स (यूएस) : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू आणि गतविजेत्या दिग्गज रॉजर फेडरर याने इंडियन वेल्स एटीपी स्पर्धेत दिमाखदार विजय मिळवताना उपांत्य फेरीत धडक मारली. फेडररने कोरियाच्या चुंग ह्योंग याचे कडवे आव्हान सरळ दोन सेटमध्ये परतावून बाजी मारली. अन्य एका सामन्यात क्रोएशियाच्या बोर्ना कोरिच याने शानदार विजय मिळवताना दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याचा पराभव केला.विक्रमी सहाव्या इंडियन वेल्सचे जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिग्गज फेडररने आपल्या लौकिकासुनार कामगिरी करताना ह्युंगला सरळ दोन सेटमध्ये ७-५, ६-१ असे नमविले. पहिल्या सेटमध्ये ह्युंगकडून कडवी झुंज मिळाल्यानंतर फेडररने तुफानी खेळ करत सहज बाजी मारताना आपला दर्जा दाखवून दिला. फेडररने ह्युंगविरुद्ध आपल्या सर्विसवर एकूण ७०% गुण मिळवले. त्याचवेळी फेडररने चार वेळा ह्युंगची सर्विस भेदली. एकूण एक तास २३ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात फेडररने आपल्या अनुभवाच्या जोरावर ह्युंगवर सहज वर्चस्व राखले.अन्य सामन्यात कोरिच याने उपांत्य फेरी गाठताना युवा केविन अँडरसनचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. पहिला सेट मोठ्या फरकाने गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या कोरिचने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना सलग दोन सेट जिंकले आणि अँडरसनचे कडवे आव्हान २-६, ६-४, ७-६ असे परतावले. (वृत्तसंस्था)व्हिनसची आगेकूचमहिलांमध्ये दिग्गज व्हिनस विलियम्सने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सात ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलेल्या व्हिनसने एकतर्फी झालेल्या सामन्यात स्पेनच्या कार्ला सुआरेज नावारो हिचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला.विशेष म्हणजे या स्पर्धेत २००१ सालानंतर पहिल्यांदा व्हिनस अंतिम चार खेळाडूंमध्ये पोहचली आहे. त्यावेळी, दुखापतीमुळे व्हिनसने उपांत्य सामन्यातून माघार घेतली होती आणि अनेक वर्ष ती या स्पर्धेपासून दूर राहिली होती.उपांत्य सामन्यात व्हिनसचा सामना रशियाच्या २० वर्षीय दारिया कासातकिनाविरुद्ध होईल. सध्या व्हिनसचा सुरु असलेला धडाका पाहता तिचा विजय निश्चित मानला जात आहे.उपांत्य फेरी गाठत फेडररने जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान आणखी मजबूत केले. गतमहिन्यात रोटरडम स्पर्धेत कारकिर्दीतील ९७ वे जेतेपद पटकावून फेडरर अव्वल स्थानी विराजमान झाला होता. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा सर्वात बुजुर्ग खेळाडू म्हणून फेडररने विक्रम नोंदवला.