शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यूएस ओपन : मारिया शारापोवा तिस-या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 04:01 IST

जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू आणि १५ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन केलेल्या मारिया शारापोवाने आपला दर्जेदार खेळ कायम राखताना यूएस ओपन स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश केला.

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू आणि १५ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन केलेल्या मारिया शारापोवाने आपला दर्जेदार खेळ कायम राखताना यूएस ओपन स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी, नवोदित अलेक्झांडर ज्वेरेव आणि निक किर्गियोस यांना स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला.स्टार खेळाडू शारापोवाने बंदीनंतर पुनरागमन करताना पहिल्याच ग्रँडस्लॅममध्ये जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या सिमोना हालेप हिला धक्का देत दिमाखदार पुनरागमन केले. यानंतर तिने हंगरीच्या ५९व्या मानांकीत टिमिया बाबोस हिचा ६-७ (४-७), ६-४, ६-१ असा पराभव करुन तिसºया फेरीत प्रवेश केला. आर्थर अ‍ॅश स्टेडियममध्ये झालेल्या या चुरशीच्या सामन्यात शारापोवाने पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत आपला हिसका दाखवाला. दुसरीकडे, आॅगस्ट महिन्यातंच झालेल्या मँट्रीयल स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिग्गज रॉजर फेडररला नमवलेल्या आणि या मोसमात ५ एटीपी विजेतेपद पटकावलेल्या ज्वेरेवला स्पर्धेबाहेर पडावे लागले. चौथ्या मानांकीत ज्वेरेवला क्रोएशियाच्या ६१व्या मानांकीत बोर्ना कोरिच याने ३-६, ७-५, ७-६(७-१), ७-६(७-४) असे नमवले. १४व्या मानांकीत निक किर्गियोसला पहिल्याच सामन्यात २३५व्या मानांकीत आॅस्टेÑलियाच्या जॉन मिलमैन याने ६-३, १-६, ६-४, ६-१ असा धक्का दिला. यंदा विम्बल्डनमध्ये उपविजेतेपद जिंकलेल्या पाचव्या मानांकीत मारिन सिलिचने जर्मनीच्या फ्लोरियन मेयरला ६-३, ६-३, ६-३ असे नमवत तिसºया फेरीत प्रवेश केला. कॅनडाच्या १८वर्षीय डेनिस शापोवालोव याने धक्कादायक निकाल नोंदवताना फ्रान्सच्या आठव्या मानांकीत ज्यो-विल्फ्रेड त्सोंगा याला ६-४, ६-४, ७-६(७-३) असा धक्का देत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. (वृत्तसंस्था)महिलांमध्ये विम्बल्डन चॅम्पियन गर्बाइन मुगुरुझाने तिसºया फेरीत प्रवेश करताना चीनच्या दुआन यिंग यिंग हिचा ६-४, ६-० असा धुव्वा उडवला. रशियाची आठवी मानांकीत स्वेतलाना कुझ्नेत्सोवा हिनेही दुसरी फेरी गाठताना झेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंद्रोउसोवाला ४-६, ६-४, ७-६(७-२) असे नमवले. तसेच, सात ग्रँडस्लॅम पटकावलेल्या अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सने फ्रान्सच्या ओसियाने डोडिन हिला ७-५, ६-४ असे नमवून विजयी कूच केली. चौथ्या मानांकीत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनेही विजयी कूच करताना रशियाच्या एवजिनिया रोडिना हिला ६-४, ६-४ असे नमवले. तसेच, अमेरिकेच्या जेनिफर ब्रेडीने अनपेक्षित विजय मिळवताना झेक प्रजासत्ताकच्या २३व्या मानांकीत बार्बोरा स्ट्रीकोवाचा ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला.कॅ नडाचा डेनिस शापोवालोव ८व्या मानांकित फ्रान्सच्याजो-विल्फ्रे ड सोंगाविरूद्ध परतीचा फटका मारताना. २ तास १२ मी.च्या चुरशीच्या झालेल्या या लढतीत डेनिसने ६-४, ६-४, ७-६ (७-३) जो-विल्फ्रेडचा असा पराभव केला.