शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

टेनिस स्टार नोव्हाक जोकोवीचच्या घरी आली नन्ही परी, नाव ठेवले तारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 17:32 IST

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोवीचच्या घरी नन्ह्या परीचं आगमन झाले आहे. नोव्हाक जोकोवीच आणि येलेना जोकोवीच दाम्पत्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे.

नवी दिल्ली, दि. 3 - सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोवीचच्या घरी नन्ह्या परीचं आगमन झाले आहे. नोव्हाक जोकोवीच आणि येलेना जोकोवीच दाम्पत्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. नोव्हाक जोकोविचचे माजी प्रशिक्षक बोरिस बेकर यांनी एका ट्विटद्वारे ही बातमी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जोकोविच दाम्पत्याने या नन्ह्या परीचे नाव तारा असे ठेवले आहे. 30 वर्षीय जोकोवीचने दुखापतीमुळे जुलैमध्ये विम्बलडनच्या उपांत्यपूर्व सामन्यातून माघार घेतली होती. स्थानिक माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जोकोवीच दाम्पत्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. दोन वर्षापूर्वी नोव्हाक जोकोवीच आणि येलेना जोकोवीच दाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली होती.

शुक्रवारी अमेरिकेनं टेनिस स्टार सेरेना विलियम्सच्या घरी नन्ह्या परीचं आगमन झाल होतं. सेरेना विल्यम्सपाठोपाठ नोव्हाक जोकोवीचच्या घरी नन्ह्या परीचे आगमन झालं आहे. या दोघांच्या मुली भाविष्यात कधी ग्रँड स्लॅम टेनीस स्पर्धेची फायनल खेळल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका अशी चर्चा गमतीने आंतरराष्ट्रीय टेनिस वर्तुळात सुरु झाली आहे.

36 वर्षीय सेरेनाने शुक्रवारी मुलीला जन्म दिला. सेरेनाची मोठी बहीण व्हिनस विल्यम्स हिने युएस ओपनच्या तिसऱ्या फेरीचा सामना जिंकल्यावर सेरेनाला मुलगी झाल्याची माहिती दिली. मी अतिशय आनंदी आहे. मावशी झाल्याचा आनंद मला शब्दात सांगता येत नाही, असं व्हिनसने म्हंटलं आहे. तसंच युएस ओपन टेनिसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सेरेनाला शुभेच्छा देणारं ट्विट करण्यात आलं आहे. सेरेना सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. सेरेना नेहमीचं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गरदोरपणाच्या दरम्यानचे फोटो अपडेट करायची. नुकतंच ती वॅनिटी फेअर मॅगझिनच्या कव्हर पेजवरही झळकली. सेरेनाचा बेबी बंम्प फ्लॉन्ट करणारा फोटो त्या मासिकाच्या कव्हर पेजवर होता.

जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनच्या दोन दिवस आधी सेरेनाला गरोदर असल्याचं समजलं होतं. त्यावेळी गरोदर असताना ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेना सहभागी झाली. सेरेनाने ग्रँड स्लॅम जिंकून आपल्या चाहत्यांसह अवघ्या टेनिस जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता. सेरेनाने सुरूवातीला ती गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली नव्हती पण अनावधानाने सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या फोटोंमुळे ती गर्भावस्थेत असल्याचं लोकांना समजलं.