लंडन : रॉजर फेडरर बुधवारी विम्बल्डनमध्ये १०० वा विजय नोंदविण्यासह राफेल नदालविरुद्ध आणखी एका उपांत्य लढतीसाठी सज्ज राहण्याच्या प्रयत्नात आहे.पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत ३० वर्षांवरील पाच खेळाडूंनी स्थान मिळविले आहे. टेनिस जगतातील दोन सर्वाधिक यशस्वी खेळाडू फेडरर व नदाल कारकिर्दीत ४० व्यांदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास २००८ नंतर प्रथमच येथे हे दोन दिग्गज एकमेकांविरुद्ध खेळतील. नदालने २००८ मध्ये फेडररचा अंतिम लढतीत पराभव केला होता. ही लढत या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत शानदार अंतिम लढत मानली जाते. आठवेळचा चॅम्पियन फेडररला उपांत्य फेरीसाठी जपानच्या केई निशिकोरीचे आव्हान मोडावे लागेल, तर नदाल अमेरिकेच्या सॅम क्वेरीविरुद्ध खेळेल.
रॉजर फेडरर विजयाचे शतक नोंदविण्यास उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 05:25 IST