शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राफेल नदालचा सोपा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:02 IST

राफेल नदालने कॅनडाच्या डेनिस शापोवालोव याच्यावर सोपा विजय मिळवला. तर नोवाक जोकोविच याने पुनरागमन करताना इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली.

रोम : राफेल नदालने कॅनडाच्या डेनिस शापोवालोव याच्यावर सोपा विजय मिळवला. तर नोवाक जोकोविच याने पुनरागमन करताना इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली. २०१८ मध्ये पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये जोको पोहचला आहे. जोकोविच याने गेल्या वर्षी जुलैनंतर पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धेत अंतिम आठमध्ये जागा बनवली आहे. त्याने स्पेनच्या अल्बर्ट रामोस विनोलास याला ६-१, ७-५ असे पराभूत केले. रोममध्ये चार वेळा विजेतेपद पटकावणारा जोकोविच आॅस्ट्रेलियन ओपननंतर सहा महिने दुखापतीमुळे कोर्टच्या बाहेर होता.गेल्या वर्षी अंतिम सामन्यात जोकोविचला पराभूत करणाऱ्या जर्मनीचा आलेक्सांद्र जोवरेव हादेखील अंतिम आठमध्ये पोहचला आहे. त्याने ब्रिटनच्या काईल एडमंड याला ७-५, ७-६ (१३/११) असे पराभूत केले. जेवरेवचा पुढचा सामना बेल्जियमच्या डेविड गॉफिनसोबत होईल.अर्जेंटिनाचा पाचवा मानांकित जुआन मार्टिन डेल पेट्रो सामन्यातून बाहेर पडल्याने डेविड अंतिम आठमध्ये पोहचला. (वृत्तसंस्था)> नदाल याने शापोवालोवला ६-४, ६-१ असे पराभूत केले. त्याचा पुढचा सामना इटलीच्या फॅबियो फोगनिनी सोबत होणार आहे. त्याने जर्मनीच्या पीटर गोजोंविस्कीला ६-४, ६-४ असे पराभूत केले. जर नदाल याने येथे आपले आठवे विजेतेपद जिंकले तर तो रॉजर फेडररला मागे टाकून जगातील नंबर वन खेळाडू बनू शकतो.