शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Miami Open: व्हीनसचा संघर्षपूर्ण विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:59 IST

तीनदा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या व्हीनस विलियम्सने रविवारी तीन मॅच पॉर्इंटचा बचाव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या

मियामी : तीनदा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या व्हीनस विलियम्सने रविवारी तीन मॅच पॉर्इंटचा बचाव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. तेथे व्हीनसला गतविजेत्या योहाना कोंटाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या व्हीनसने २९ व्या मानांकित नेदरलँडच्या किकी बर्टन्सचा ५-७, ६-३, ७-५ ने पराभव केला. पहिल्या सेटमध्ये व्हीनसने ५-० अशी आघाडी घेतली होती, पण त्यानंतर तिने तीन सेट पार्इंट गमावले. बर्टन्सने सलग सात गेम जिंकत पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. दुसरा सेटही रंगतदार ठरला, पण त्यात व्हीनसने सरशी साधली.तिसºया सेटमध्ये व्हीनस १-४ ने पिछाडीवर होती. बर्टन्स ५-३ असा स्कोअर असताना सर्व्हिस करीत होती, पण दोन मॅच पॉर्इंटचा तिला लाभ घेता आला नाही. पुढच्या गेममध्ये तिला आणखी मॅच पॉर्इंट मिळाला, पण व्हीनसने त्याचा बचाव करताना विजय साकारला.अन्य सामन्यात कोंटाने एकतर्फी झालेल्या सामन्यात बेल्जियमच्या एलिस मार्टन्सचा ६-२, ६-१ ने पराभव केला. तसेच, चौथे मानांकन प्राप्त एलिना स्वितलोना, फ्रेंच ओपन चॅम्पियन येलेना ओस्टापेंका आणि रिओ आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेती मोनिका पुइग यांनीही पुढची फेरी गाठली. (वृत्तसंस्था)