शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

शेर ढेर; बिगरमानांकित जिंकले! ‘राफा’चे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:35 IST

जागतिक मानांकनात तिस-या क्रमांकावर असलेला ग्रिगोर दिमित्रोव आणि महिलांमध्ये चौथ्या क्रमांकावरील एलिना स्वेतलाना या दिग्गज खेळाडूंना मंगळवारी जबर धक्का बसला. या दोघांनाही बिगरमानांकित खेळाडूंकडून पराभूत व्हावे लागले. दिमित्रोवला इंग्लंडच्या काइल एडमंडने, तर स्वेतलानाला एलिसे मर्टेन्स हिने पराभूत केले. स्पर्धेतील हा मोठा उलटफेर ठरला.

मेलबर्न : जागतिक मानांकनात तिस-या क्रमांकावर असलेला ग्रिगोर दिमित्रोव आणि महिलांमध्ये चौथ्या क्रमांकावरील एलिना स्वेतलाना या दिग्गज खेळाडूंना मंगळवारी जबर धक्का बसला. या दोघांनाही बिगरमानांकित खेळाडूंकडून पराभूत व्हावे लागले. दिमित्रोवला इंग्लंडच्या काइल एडमंडने, तर स्वेतलानाला एलिसे मर्टेन्स हिने पराभूत केले. स्पर्धेतील हा मोठा उलटफेर ठरला.विश्वमानांकनात ४९ व्या स्थानावरील एडमंडने दिमित्रोवचा एक तास ४९ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-४, ३-६, ६-३, ६-४ ने पराभव करीत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. ग्रॅण्डस्लॅमच्या सेमी फायनलमध्ये पोहोचणारा एडमंड सहावा ब्रिटिश खेळाडू आहे.आता त्याचा सामना मरिन सिलीचशी होईल. विजयानंतर एडमंड खूप खूश झाला. अशा निकालाने मलाही आनंद झाला आहे. राड लोवर एरिनामध्ये माझा हा पहिलाच सामना होता आणि तो खास राहिला.महिला गटात, आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाºया बिगरमानांकित बेल्जियमच्या एलिसे मर्टेन्सने जगात चौथ्या क्रमांकाच्या युक्रेनच्या एलिना स्वेतलानाचा पराभव केला. हा सामना एक तास १३ मिनिटे चालला. तिने स्वेतलानावर ६-४, ६-० ने सरळ सेटमध्ये मात केली. मर्टेन्सने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. अंतिम चारमध्ये पोहोचणारी ती बेल्जियमची पहिली खेळाडू आहे. आता तिचा सामना दुसºया मानांकित कॅरोलिन वोज्नियाकी किंवा कार्ला सुआरेजविरुद्ध होईल.(वृत्तसंस्था)‘राफा’चे आव्हान संपुष्टात...जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू स्पेनच्या राफेल नदालला दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागल्याने उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. विशेष म्हणजे त्याने नुकताच गुडघा दुखापतीतून सावरून दिमाखात पुनरागमन केले होते.क्रोएशियाच्या मरिन सिलिच याच्याविरुद्ध रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाचव्या सेटमध्ये ०-२असा पिछाडीवर पडल्यानंतर नदालला दुखापतीमुळे खेळणे कठीण झाले आणि त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला.३ तास ४७ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या संघर्षामध्ये जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या चिलिचने नदालला चांगलेच झुंजवले.सामन्यात ६-३, ३-६, ७-६, २-६, ०-२ असा पिछाडीवर पडल्यानंतर उजव्या मांडीचे स्नायू आखडल्याने नदालने माघार घेण्याचा निर्णय घेतला. यासह नदालची चिलिचविरुद्ध सलग सहा विजयांची मालिका खंडित झाली. आता उपांत्य फेरीत चिलिचपुढे जायंट किलर ठरलेल्या ब्रिटनच्या काएल एडमंडचे कडवे आव्हान असेल.

बोपन्नाला विजयाने दिलासा...-पुरुष दुहेरीत बोपन्नाचे आव्हान संपुष्टात आले. आता मिश्र दुहेरीत त्याने हंगेरीच्या तिमिया बाबोससोबत खेळताना विजय मिळवला. या विजयानंतर ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली. त्यामुळे भारताच्या रोहन बोपन्नाला मोठा दिलासा मिळाला.-पाचव्या मानांकित बोपन्ना-बाबोस जोडीने अमेरिकेच्या वानिया किंग आणि क्रोएशियाच्या फ्रान्को स्कूगोरचा ६-४, ६-४ ने पराभव केला. हा सामना एक तास चालला. पहिल्या सेटच्या तिसºया गेममध्ये बोपन्ना-बाबोसने २-१ ने आघाडी मिळवली होती.-गेल्या सामन्यात त्यांनी वॉशिंग्टन-पेपेज जोडीचा ६-२, ६-४ ने पराभव केला होता.आता बोपन्नाच्या रूपात भारताचे एकमेव आव्हान बाकी आहे. लिएंडर पेस, पुरव राजा, दिविज शरण बाहेर पडले आहेत.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपन