शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन वेल्स टेनिस; सेरेना - व्हिनस भिडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:38 IST

टेनिसविश्वात दमदार पुनरागमन केलेल्या दिग्गज सेरेना विलियम्सने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना तिस-या फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे आता तिस-या फेरीत तिचा सामना आपली मोठी बहिण व्हिनस विलियम्स विरुद्ध होणार असून या रोमांचक सामन्याची सर्व टेनिसप्रेमींना उत्सुकता लागली आहे.

इंडियन वेल्स (यूएस) : टेनिसविश्वात दमदार पुनरागमन केलेल्या दिग्गज सेरेना विलियम्सने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना तिस-या फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे आता तिस-या फेरीत तिचा सामना आपली मोठी बहिण व्हिनस विलियम्स विरुद्ध होणार असून या रोमांचक सामन्याची सर्व टेनिसप्रेमींना उत्सुकता लागली आहे.२३ वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाने आपल्य लौकिकानुसार विजयी कामगिरी करताना नेदरलँड्सच्या बर्टन्सला ७-६, ७-५ असे नमवले. दरम्यान, मुलीला जन्म दिल्यानंतर पुनरागमन करत असलेल्या सेरेनाला या विजयासाठी काहीसे झुंजावे लागले. तरीही तिने आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर बर्टन्सचे कडवे आव्हान टायब्रेकमध्ये परतावले. त्याचवेळी दुसरीकडे झालेल्या एकतर्फी सामन्यात दिग्गज व्हिनस विलियम्सने सहजपणे आगेकूच करताना रोमानियाच्या सोराना सर्स्टी हिचा केवळ ७९ मिनिटांमध्ये ६-३, ६-४ असा धुव्वा उडवला. (वृत्तसंस्था)पुन्हा एकदा थरारच्आता तिसºया फेरीत विलियम्स भगिनी एकमेकींविरुद्ध लढतील. व्हिनस आणि सेरेना दोघीही आपल्या शानदार कारकिर्दीमध्ये एकूण २८वेळा एकमेकींविरुद्ध भिडले आहेत.च्गेल्याच वर्षी आॅस्ट्रे लियन ओपनच्या अंतिम फेरीत सेरेनाने व्हिनसचा ६-४, ६-४ असा पराभव करत जेतेपद पटकावले होते.च्यानंतर सेरेना गर्भवती असल्याने टेनिसपासून दूर राहिली आणि त्यानंतर तिने पुनरागमन करत आपल्या पहिल्या स्पर्धेत छाप पाडली आहे. सेरेनाने विजयी कामगिरी करत यापुढच्या स्पर्धांतही आपला धडाका कायम राहिल, असा इशाराच दिला आहे.सेरेना विलियम्सएलिना स्वितोलिनाची विजयी आगेकूचअन्य लढतीत चौथ्या मानांकीत एलिना स्वितोलिना हिने जर्मनीच्या मोना बार्थेल हिचा ६-४, ६-३ असा सहज पराभव करत दिमाखात तिसरी फेरी गाठली आहे. पुढील सामन्यात तिचा सामना कार्ला सुआरेजविरुद्ध होईल. कर्लाने तैवानच्या सिए सु वेई हिचा ६-४, २-६, ६-३ असा पराभव करत आगेकूच केली आहे. 

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्सSportsक्रीडा