शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

डेव्हिस कप प्लेआॅफ लढतीत कॅनडाविरुद्ध भारत १-२ ने पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:22 IST

डेव्हिस कप प्लेआॅफ लढतीत महत्त्वाच्या दुहेरीच्या सामन्यात रोहन बोपन्ना व पुरव राजा यांना पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.

एडमन्टन : डेव्हिस कप प्लेआॅफ लढतीत महत्त्वाच्या दुहेरीच्या सामन्यात रोहन बोपन्ना व पुरव राजा यांना पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.बोपन्ना व राजा यांना २ तास ५२ मिनिटे रंगलेल्या लढतीत डॅनियल नेस्टर व वासेक पोसपिसिली यांच्याविरुद्ध ५-७, ५-७, ७-५, ३-६ ने पराभव स्वीकारावा लागला. भारताला आता १६ देशांच्या एलिट विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवण्यासाठी परतीच्या एकेरीच्या दोन्ही लढतींमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. एटीपी टूरमध्ये एकेरीतही खेळणारा २७ वर्षीय पोसपिसिली कोर्टवर उतरणारा एकमेव खेळाडू होता. त्याने बेसलाईनजवळ केलेला चमकदार खेळ निकालातील अंतर स्पष्ट करणारा ठरला.पोसपिसिलीची त्याच्या कर्णधाराने एकेरीच्या लढतीसाठी निवड केली होती, पण त्याला दुहेरीत खेळविण्यात आले. त्याने चमकदार कामगिरी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कारण ४५ वर्षीय नेस्टर अनेकदा दडपणाखाली असल्याचे दिसून आले.दिवीज शरणच्या साथीने सर्किटमध्ये चांगली प्रगती करणा-या राजाने नेटलगत शानदार खेळ केला. त्याचे व्हॉली विनर शानदार होते, पण सर्व्हिस व बेसलाईनजवळ खेळताना त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि त्याची भारताला झळ बसली.अखेरच्या क्षणी संघात स्थान मिळालेल्या राजाने पाच वेळा सर्व्हिस गमावली. त्यात पहिल्या दोन सेटमध्ये संघ ५-६ ने पिछाडीवर असताना सर्व्हिस गमावली. नेस्टरने २००८ व २००९ मध्ये सर्बियाच्या नेनाद जिमोनजिचच्या साथीने आणि पोसपिसिलीने २०१४ मध्ये ब्रिटनच्या जॅक सोकच्या साथीने विम्बल्डनचे जेतेपद पटकावले आहे. या लढतीत बोपन्नाला सर्वाेत्तम कामगिरी करता आली नाही, अशी कबुली भूपतीने या वेळी दिली. पहिल्या दिवशी भारतातर्फे एकेरीत विजय मिळवणारा रामकुमार रामनाथन आता एकेरीच्या परतीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत ५१ व्या स्थानावर असलेल्या डेनिस शापोवालोव्हविरुद्ध खेळेल तर भांबरीची लढत ब्रेडन शनूरविरुद्ध होईल. रामकुमार धक्कादायक निकाल नोंदविण्यात यशस्वी ठरला तर कॅनडा दुस-या लढतीत पोसपिसिलीला खेळविण्याची शक्यता आहे. रामकुमारसाठी त्याची सर्व्हिस व व्हॉली महत्त्वाच्या ठरणार असल्याचे भूपतीने म्हटले आहे.>राजाचे अपेक्षित सहकार्य लाभले नाहीबोपन्ना वेगवान सर्व्हिससाठी ओळखला जातो, पण आज त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. भारताने एकूण १२ दुहेरी चुका केल्या त्यात पाच चुका बोपन्नाने केल्या. दडपणाखाली बोपन्ना मात्र सर्व्हिस राखण्यात यशस्वी ठरला. त्याला राजाचे अपेक्षित सहकार्यही लाभले नाही आणि स्वत:चा खेळही उंचावता आला नाही.आम्ही चांगली कामगिरी करीत सामन्यावर नियंत्रण मिळवण्याच्या स्थितीत होतो, पण त्याचा आम्हाला लाभ घेता आला नाही. विम्बल्डन चॅम्पियनविरुद्ध खेळताना जर संधीचा लाभ घेता आला नाही तर विजयाचे हकदार असूच शकत नाही.- महेश भूपती