शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शापोवालोव्हमुळे कॅनडा पुन्हा विश्व गटात, भारत ३-२ ने पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 03:42 IST

रामकुमार रामनाथनला ‘करा अथवा मरा’ लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताला पुन्हा एकदा आशियाई विभागात आव्हान सादर करावे लागेल.

एडमंटन : रामकुमार रामनाथनला ‘करा अथवा मरा’ लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताला पुन्हा एकदा आशियाई विभागात आव्हान सादर करावे लागेल. डेनिस शापोवालोव्हच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कॅनडाने भारताचा ३-२ ने पराभव केला आणि डेव्हिस कप विश्व गट टेनिस स्पर्धेत पुन्हा स्थान मिळवले.भारताला अखेरच्या दिवशी रामकुमारकडून चमत्काराची आशा होती; पण त्याला संधीचा लाभ घेता आला नाही. जागतिक क्रमवारीत ५१ व्या स्थानावर असलेल्या शापोवालोव्हने ६-३, ७-६, ६-३ ने सरशी साधत कॅनडाला ३-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.युकीने त्यानंतर स्पर्धेची औपचारिकता पूर्ण करणाºया पाचव्या सामन्यात ब्रायडन शनूरचा ६-४, ४-६, ६-४ने पराभव केला. या निकालानंतरही इंडोर कोर्टमध्ये खेळल्या गेलेल्या विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीत भारताला २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. भारत सलग चौथ्या वर्षी प्ले आॅफचा अडथळा पार करण्यात अपयशी ठरला. गेल्या तीन प्रयत्नात भारताला सर्बिया, चेक प्रजासत्ताक व स्पेन यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. >आम्हाला संधीचा लाभ घेता आला नाही. आम्ही सर्वंच सामन्यांत संधी गमावली. सोमवारी दुस-या सेटमध्ये बरोबरी साधण्यासाठी रामकुमारकडे चार सेट पॉइंट््स होते. आम्ही कडवी झुंज दिली आणि आम्हाला विश्व गटात स्थान मिळवण्याची चांगली संधी होती. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत युकी व रामकुमार दोघेही अव्वल १०० मध्ये स्थान मिळवतील, अशी मला आशा आहे.- महेश भूपती